Ananda Mohan Chakrabarty : प्रसिद्ध सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, संशोधक आनंद मोहन चक्रवर्ती

प्रोफेसर चक्रवर्ती यांनी आपल्याला पेटंट मिळावे यासाठी न्यायालयात खटला लढवला. सुदैवाने न्यायालयाने प्रोफेसर चक्रवर्ती यांच्या बाजूने निर्णय दिला. प्रोफेसर चक्रवर्ती यांना त्यांनी निर्माण केलेल्या जीवाणूंसाठी पेटंट देण्यात आलं.

75
Ananda Mohan Chakrabarty : प्रसिद्ध सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, संशोधक आनंद मोहन चक्रवर्ती

आनंद मोहन चक्रवर्ती (Ananda Mohan Chakrabarty) हे एक प्रसिद्ध सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, संशोधक आणि वैज्ञानिक होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९३८ साली सैंथिया या ठिकाणी झाला. त्यांनी आपलं शिक्षण रामकृष्ण मिशन विद्यामंदिर आणि सेंट झेवीयर्स कॉलेज येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी १९६५ साली कलकत्ता विद्यापीठातून पीएचडी मिळवली. (Ananda Mohan Chakrabarty)

प्रोफेसर चक्रवर्ती (Ananda Mohan Chakrabarty) हे जनरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरसाठी काम करत होते. १९७१ साली त्यांनी स्युडोमोनस नावाच्या जिवाणूंची निर्मिती केली. हे जिवाणू तेलामध्ये आढळणाऱ्या हायड्रोकार्बनला पचवण्यास मदत करतात. जेव्हा या जीवाणूंसाठी त्यांनी पेटंट मिळावे म्हणून अर्ज केला त्यावेळी लोक प्रोफेसर चक्रवर्ती यांना ओळखायला लागले. (Ananda Mohan Chakrabarty)

(हेही वाचा – IPL 2024, Sunil Narine : सुनील नरेनने ईशांत शर्माची ३ षटकार मारत धुलाई केली ते षटक)

प्रोफेसर चक्रवर्तींनी यावर केलं संशोधन

प्रोफेसर चक्रवर्ती (Ananda Mohan Chakrabarty) यांना अमेरिकेकडून पेटंट मिळण्याआधी युनायटेड किंगडम यांच्याकडून पेटंट मिळाले होते. सुरुवातीला त्यांना जीवाणूंसाठी पेटंट द्यायला नकार दिला गेला. पण अमेरिकेत ल्युई पाश्चर याने आधीच दोन मानवनिर्मित सूक्ष्मजीव आपल्या नावाने पेटंट केलेले होते. प्रोफेसर चक्रवर्ती यांनी आपल्याला पेटंट मिळावे यासाठी न्यायालयात खटला लढवला. सुदैवाने न्यायालयाने प्रोफेसर चक्रवर्ती यांच्या बाजूने निर्णय दिला. प्रोफेसर चक्रवर्ती यांना त्यांनी निर्माण केलेल्या जीवाणूंसाठी पेटंट देण्यात आलं. (Ananda Mohan Chakrabarty)

त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत शरीरात कँसर वाढवणाऱ्या कोशिकांना कसे प्रतिबंधित करता येईल यावर संशोधन केलं. २००८ साली प्रोफेसर आनंद मोहन चक्रवर्ती (Ananda Mohan Chakrabarty) यांनी गुजरात येथील अहमदाबाद येथे एका बायोफर्मास्युटिकल कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीचं नाव अमृता थेरेप्युटीकस लिमिटेड असं होतं. या कंपनीद्वारे कँसरविरोधी तसेच इतर रोगांवरील उपचारासाठी लस, औषधे यांचं संशोधन करण्यात आलं. जेनेटिक इंजिनिअरिंग संशोधन कार्यातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने प्रोफेसर आनंद मोहन चक्रवर्ती यांना २००७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. (Ananda Mohan Chakrabarty)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.