Rangoli : रांगोळीचे बदलते रंगरूप !

रांगोळीचे रूप काळानुसार बदलले आहे. घराच्या अंगणातील रांगोळी आता मोठमोठ्या सेलिब्रेशनचा भाग झाली आहे

188
Rangoli : रांगोळीचे बदलते रंगरूप !
Rangoli : रांगोळीचे बदलते रंगरूप !

दिवाळीचा सण जसा दिव्यांचा असतो, तसाच तो रंगांची मुक्त उधळण केलेल्या रांगोळ्यांचाही (Rangoli) असतो. मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी रांगोळी घरोघरी काढली जाते. पूर्वी गेरुने सारवलेल्या चौकोनात पांढ-या रंगाच्या रांगोळीचा वापर करत ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. त्यात स्वस्तिक, हळद-कुंकू, लक्ष्मीची पावले अशी चिन्हे असत. रांगोळीचे रूप काळानुसार बदलले आहे. घराच्या अंगणातील रांगोळी (Rangoli) आता मोठमोठ्या सेलिब्रेशनचा भाग झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने रांगोळीच्या बदलत्या रंग-रूपाचा घेतलेला मागोवा…

* इमारतींमध्ये फ्लॅटच्या प्रवेशद्वाराच्या किंचित बाजूला छोटीशी का होईना; पण सुबक रांगोळी आवर्जून काढली जाते.

* सणावारी ठिपक्यांच्या रांगोळीची जागा आता संस्कारभारतीच्या भव्यदिव्य रांगोळ्यांनी घेतली आहे.

Thipkyanchi Rangoli

* अलीकडे मुक्तचित्र रांगोळ्या काढण्यावर भर दिला जात असून निसर्गचित्र, पानं-फुलं, फुलांचा गुच्छ, नक्षीकाम, पक्षी, मोर किंवा स्वत: एखादा काल्पनिक देखावा काढण्याकडे कल दिसून येतो.

(हेही वाचा – Rto Action : मुंबई प्रदूषण करणाऱ्या ८१ वाहनांवर कारवाई)

* अलीकडे मोठ्या कार्यक्रमात व्यक्तीचित्र रांगोळ्या (Portraits) आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

* ज्यांना रांगोळी काढता येत नाही, त्यांच्यासाठी विविध नक्षी असलेले प्लास्टिकचे रेडीमेड छाप उपलब्ध झाल्याने सर्वांना रांगोळी काढण्याचा आनंद घेता येतो.

* फुलांची रांगोळी, पाण्यावर तरंगणारी रांगोळी, निसर्ग देखावे, सुलेखन अशा नानाविध प्रकारांनी रांगोळी रेखाटली जात आहे.

* रंगांमध्येही बदल झाले असून भडक केशरी, गुलाबी, लाल, पोपटी अशा निऑन रंगांच्या रांगोळीलाही आता मागणी आहे.

Sanskar Bharati

* चंदेरी, सोनेरी, लाल अशा वेगवेगळ्या रंगांच्या चकमकीचा वापर करत रांगोळीला सजवली जाते.

* रांगोळीचे रेडीमेड स्टीकर्सही बाजारात उपलब्ध झाले आहेत.

काळानुसार रांगोळी (Rangoli) कलेमध्ये अनेक बदल होत आहेत. मात्र रांगोळीची मोहकता, तिच्या अस्तित्वात निर्माण होणारी प्रसन्नता कायम टिकून आहे !

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.