Actress Juhi Chawla: सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला!

जुहीने १९८४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि विजेतेपद पटकावले.

131
Actress Juhi Chawla: सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला!
Actress Juhi Chawla: सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला!

जुही चावला (Actress Juhi Chawla) एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल, चित्रपट निर्माती आहे. तिने १९८६ मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. बंगाली, पंजाबी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांसह तिने मुख्यतः हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुही चावला १९८४ मध्ये मिस इंडिया झाली होती आणि १९८४ मध्येच मिस युनिव्हर्स बेस्ट कॉस्च्युमचा पुरस्कारही जिंकला होता.

जुही चावलाचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी लुधियाना, पंजाब येथे पंजाबी डॉ. एस. चावला आणि गुजराती आई मोना यांच्या घरी झाला. तिचे वडील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी होते. तिच्या मोठ्या भावाचे नाव बॉबी चावला आणि बहिणीचे नाव सोनिया चावला आहे. जुही चावलाने बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुलेदेखील आहेत, त्यांच्या मुलाचे नाव अर्जुन आणि मुलीचे नाव जाहन्वी आहे.

(हेही वाचा – ICC Cricket World Cup IND VS NED : भारतीय क्रिकेट संघाने सामन्यात केली ‘नेट प्रॅक्टिस’; नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव )

जय मेहता आणि जुही चावला हे इंडियन प्रीमियर लीग संघ कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक आहेत, ज्यांनी त्यांच्या कंपनी रेड चिली एंटरटेनमेंट अंतर्गत शाहरुख खानसोबत भागीदारी केली आहे. तिचा भाऊ बॉबी चावला रेड चिली एंटरटेनमेंटचा सीईओ होता. जुही चावलाने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईच्या फ्रंट कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले. तिने पुढील शिक्षण मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून केले. जुहीने शास्त्रीय नृत्य आणि गायनाचे प्रशिक्षणही घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जुहीने १९८४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि विजेतेपद पटकावले, तिने १९८४ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पोशाख पुरस्कार देखील जिंकला आहे. त्यानंतर ती चित्रपट क्षेत्राकडे वळली.

जुही चावलाने १९८६ मध्ये सल्तनत या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर १९८७ मध्ये जुहीने कन्नड चित्रपट प्रेमलोक मध्ये काम केले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि जुहीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर तिने १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट केला, या चित्रपटात जुही आणि आमिर खान मोठ्या पडद्यावर दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि यानंतर जुहीने मागे वळून पाहिले नाही.

पुढे तिने अनेक हिंदी चित्रपटांतून काम केले. त्याचबरोबर बंगाली, पंजाबी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. जुहीने झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनसाठी टॅलेंट जज म्हणून काम केले. तिने अनेक स्टेज शो आणि कॉन्सर्ट टूरमध्ये भाग घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.