Rto Action : मुंबई प्रदूषण करणाऱ्या ८१ वाहनांवर कारवाई

52

सध्या वायू प्रदूषण ही समस्या चांगलीच भेडसावत आहे. त्याप्रमाणेच मुंबई शहरात होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर आरटीओ विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या ४१७ वाहनांच्या पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी आढळली. (Rto Action)

मुंबईत मालवाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला माल आच्छादित करण्यात येत नाही, असे आढळले आहे.भारक्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मालाची खडी, सिमेंट वीट, डबर, वाळू इत्यादी वाहतूक तसेच ट्रान्झिट मिक्सरद्वारे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी आरटीओ कार्यालायांना दिले होते. तर राज्यात १९८६ वाहनांची तपासणी केली.

(हेही वाचा : High Court order : रात्री १२ नंतरही फटाके फ़ुटलेच)

यामध्ये ३०५ वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून ५. ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषीवायू प्रदूषणाबाबत न्यायालयाने सुनावल्यानंतर परिवहन विभाग आणखी कारवाई वाढवत पीयूसी कारवाईबाबत विशेष मोहीम सुरु केली. राज्यातील २६५२ पैकी २६६ पीयूसी केंद्रांची तपासणी करण्यात आली; पण त्यामध्ये एकही दोषी आढळले नाही. या प्रकरणात १ लाख १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.