Pune Fire : दुकानांना लागली मध्यरात्री भीषण आग; दोन जखमी

आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही मात्र तीन स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली

146
Pune Fire
Pune Fire : दुकानांना लागली मध्यरात्री भीषण आग; दोन जखमी

सातारा रस्त्यावर नातूबाग बस (Pune Fire) स्थानक समोरील, इंद्रनिल सोसायटी मधील चार दुकानांना भीषण आग लागल्याची घटना रविवार ३० एप्रिल मध्यरात्री दोन वाजता घडली. लागली

या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. कात्रजसह कोंढवा आणि सिंहगड रोड (Pune) अग्निशमन केंद्राच्या मिळून आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणली, तत्पूर्वी या भिषण आगीत देवयानी इलेक्ट्रॉनिक (दोन गाळे), गृहिणी किचन आणि देवयानी मोबाईल शाँपी संपूर्ण जळून खाक झाले होते.

(हेही वाचा – Pakistani 14 apps blocks: पाकिस्तानच्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारतात बंदी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यराञी १.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आगीची माहिती अग्निशमन दल नियंत्रण (Pune Fire) कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच दलाकडून कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून ०६ फायरगाड्या २ वॉटर टँकर व १ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक महेश वाबळे देखील उपस्थित होते, या दुर्घटनेत समीर कोलते, गंभीर जखमी झाले असून रस्त्यावरुन जाणारा एक नागरिक जखमी झाला आहे.

हेही पहा

या आगीचे स्वरूप भिषण होते. घटनास्थळी तीन (Pune Fire) दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यात होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. यामध्ये गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या.

आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही मात्र तीन स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली, स्फोट इतके मोठे होते की, दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली. दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य मुख्य सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गापर्यंत पडले होते. रस्त्यांवर काचांचा खच पडला होता, एक दुचाकी पुर्ण जळून खाक झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.