Pakistani 14 apps blocks: पाकिस्तानच्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारतात बंदी

135
Pakistani 14 apps block
Pakistani 14 apps blocks: पाकिस्तानच्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारतात बंदी

पाकिस्तानामधून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये Bchat चा देखील समाविष्ट आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय आयटी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. (Pakistani 14 apps blocks)

बंदी घातलेले मेसेंजर अ‍ॅप्स (Pakistani 14 apps block)

बंदी घातलेल्या मेसेंजर अ‍ॅप्समध्ये Crypvisor, Enigma, SafeSwiss, Vikerme, Mediafire, Briar, Bchat, Nandbox, Conion, IMO, Elementor, Second Line, Jangi आणि Threema यांचा समावेश आहे. (Pakistani 14 apps block)

सीमेपलीकडून येणारे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करत होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, या मोबाइल अ‍ॅप्सचा सर्वाधिक वापर जम्मू-काश्मीरमध्येच झाल्याचे आढळून आले आहे. या अ‍ॅप्समुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले. याआधीही भारत सरकारने पाकिस्तानमधून चालणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंटवरही बंदी घातली होती. (Pakistani 14 apps block)

(हेही वाचा – LPG Gas Price : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल, घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर)

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार गेल्या काही दिवसांपासून या ॲप्लिकेशन्सचा वापर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ओव्हरग्राउंड कामगार आणि इतर कार्यकर्त्यांना कोडेड संदेश पाठवण्यासाठी केला होता. (Pakistani 14 apps block)

चिनी अ‍ॅप्सवरही घातली बंदी

गेल्या काही वर्षांत भारत सरकारने सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सुमारे २५० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, Xender, CamScanner, PUBG Mobile आणि Garena Free Fire या लोकप्रिय मोबाईल गेम्सचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.