Mohan Bhagwat : ‘सेतुबंध’च्या मराठी आवृत्तीचे सरसंघचालक भागवतांच्या हस्ते प्रकाशन

166
Mohan Bhagwat : ‘सेतुबंध’च्या मराठी आवृत्तीचे सरसंघचालक भागवतांच्या हस्ते प्रकाशन
Mohan Bhagwat : ‘सेतुबंध’च्या मराठी आवृत्तीचे सरसंघचालक भागवतांच्या हस्ते प्रकाशन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम किंवा ख्रिश्चन विरोधी नाही. हिंदूंचे संघटन करणे हा सकारात्मक विचार घेऊन संघ काम करतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरील ‘सेतुबंध’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी-राजाभाऊ नेने यांनी गुजरातीत लिहिलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.

संघाला मुसलमान चालू लागले का, अशी चर्चा रंगली असताना मोहन भागवत यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यावर प्रकाश टाकला. विशिष्ट परिस्थितीत काही प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असते. पण विचार म्हणून संघ हा मुस्लिम किंवा ख्रिश्चन विरोधी नाही. कोणालाही विरोध करणे हा संघाचा विचार नाही. संघ प्रतिक्रियावादी नाही तर हिंदू समाजाचे संघटन करणे हा सकारात्मक विचार घेऊन संघ काम करतो. हाच विचार या पुस्तकातही आपल्याला दिसतो, असे भागवत यांनी स्पष्ट केले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात जमात ए इस्लामचे लोकही होते. तेव्हा त्यांच्याही संघाविषयीचा दृष्टीकोन बदलला याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी अग्निपरीक्षा; बुधवारच्या बैठकीतून समजणार आमदारांचा कौल)

लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरी सेतुबंध हे पुस्तक गुजरातीत पहिल्यांदा आले, मात्र त्यानंतर मराठीत येण्यास त्याला खूप उशीर झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लक्ष्मणराव जगताप हे तपस्वी होते. प्रचंड क्षमता असतानाही पक्ष्याप्रमाणे उड्डाण करण्याऐवजी त्यांनी माणसात राहून आपल्या मागे पिढ्या घडविण्याचे काम त्यांनी केले. संघाची दृष्टी, संघाचा विचार स्पष्टपणे ज्यांना समजला आहे, असे ते व्यक्तिमत्व हाेते असे ते म्हणाले.

रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा परिस्पर्श ज्यांना झाला त्यातील एक परिससमान व्यक्तिमत्त्व म्हणजे लक्ष्मणराव इनामदार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक विमल केडिया या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इनामदार यांचा सहवास लाभलेले श्री. केडिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मराठी रूपांतराला डॉ. अशोक कामत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकाशक आनंद लिमये यांनी सूत्रसंचालन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.