महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतन धारकांचे ‘फॉर्म – १६’ तयार

324
महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतन धारकांचे ‘फॉर्म – १६’ तयार

मुंबई महानगरपालिकेचे साधारण १ लाख ९ हजार ६४१ निवृत्तीवेतन धारक आहेत. यापैकी साधारण ७४ हजार ९५२ इतक्या निवृत्तिवेतनधारकांचे ‘प्रपत्र-१६’ अर्थात फॉर्म सिक्सटिन महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या स्तरावर आयकर व परतावा विषयक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन धारकांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक वर्ष २०२२-२३ चे आयकर विषयक ‘प्रपत्र – १६’ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेतर्फे सालाबादप्रमाणे कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारक यांना आर्थिक वर्ष २०२२-२३ चे आयकर विषयक ‘प्रपत्र – १६’ ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जेणेकरुन, निवृत्तीवेतन धारकांना घरबसल्या आवश्यक ती संबंधीत कार्यवाही करणे सुलभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) विभागाच्या सुलोचना कवडे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – अजित पवारांची साथ, क्षणिक की दीर्घकाळ?)

आपला ‘FORM 16’ दोन भागांमध्ये म्हणजे ‘भाग अ’ (PART A) आणि ‘भाग ब’ (PART B) स्क्रीनवर दिसेल. ‘भाग अ’ (PART A) हा आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महानगरपालिकेकडून एकूण वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे आणि ‘भाग ब’ (PART B) हा आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उत्पन्न, गुंतवणूक व त्यावरील आयकर यांचा तपशील आहे. त्यानंतर ‘डाऊनलोड’ (Download) वर क्लिक करावे.

मार्च २०२४ पर्यंत आहे उपलब्ध

‘भाग अ’ (PART A) मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, ‘भाग ब’ (PART B) मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रकमेतून वजा करुन योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी आणि निर्धारित वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न आयकर खात्याला सादर करावे. आर्थिक वर्ष २०२२-२३ चे प्रपत्र – १६ महापालिकेच्या संकेतस्थळावर फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध राहील, याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी.

सप्टेंबर २०२३ पर्यंत करा सादर

आयकर विभागाच्या नियम क्रमांक 26C नुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता निवृत्तीवेतन धारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतले असल्यास वित्तीय संस्थेच्या ‘पॅन’ क्रमांकासह सर्व माहिती ‘प्रपत्र-१२ बीबी’ (12BB) मध्ये नमूद करुन ते पुढील पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावेः निवृत्तीवेतन (आयबी) विभाग, ‘ई’ विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम). मुंबई ४००००८.

कशाप्रकारे मिळवाल हे फॉर्म सिक्सटिन (‘FORM 16’ )

ही ऑनलाईन प्रपत्रे कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरचा उपयोग करुन प्राप्त करता येऊ शकतील.

– इंटरनेट ब्राऊझर ओपन केल्यानंतर ‘https://form16.mcgm.gov.in’ या संकेतस्थळावर लॉगीन करावे.

-दिलेल्या चौकोनामध्ये कर्मचारी संकेतांक नमूद करणे.

-त्याखालील चौकोनामध्ये ‘पॅन’ क्रमांकाची अचूक नोंद करावी.

-कर्मचारी संकेतांक आणि पॅन क्रमांकाची नोंद केल्यावर स्क्रीन वर दिसणाऱ्या captcha code दिलेल्या चौकोनामध्ये अचूक नोंद करणे

– नंतर ‘कन्फर्म’ (confirm) वर क्लिक करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.