PTI Campaign Rally: पाकिस्तानात पीटीआयच्या प्रचारसभेत स्फोट, 4 ठार, 6 जखमी

जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

162
PTI Campaign Rally: पाकिस्तानात पीटीआयच्या प्रचारसभेत स्फोट, 4 ठार, 6 जखमी
PTI Campaign Rally: पाकिस्तानात पीटीआयच्या प्रचारसभेत स्फोट, 4 ठार, 6 जखमी

बलुचिस्तानच्या सिबी येथे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (Pakistan Tehreek-e-Insaf) (पीटीआय) 31 जानेवारीला निघालेल्या निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. पोलीस आणि वैद्यकीय परीक्षकांनी याला दुजोरा दिला आहे.

डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी हा बॉम्बस्फोट झाला. सिबी येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबर यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला. 8 फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या केवळ 9 दिवस आधी ही घटना घडली.

(हेही वाचा – Madras High Court : हिंदुनाच हिंदू मंदिरात प्रवेश, मद्रास हायकोर्टाचा निर्णय )

सिबी एस. एच. ओ. जकाउल्ला गुज्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पक्ष समर्थित उमेदवार सद्दाम तरीन यांच्या निवडणूक प्रचारसभेत हा स्फोट झाला, असे पीटीआयने म्हटले आहे. एन. ए.-253 (झियारत) मतदारसंघातून तरी तरीन उमेदवार आहेत. मृतांमध्ये ३ कामगारांचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.