Madras High Court : हिंदुनाच हिंदू मंदिरात प्रवेश, मद्रास हायकोर्टाचा निर्णय

दक्षिणेकडील अनेक मंदिरांमध्ये कोडिमारम (ध्वजस्तंभ) उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये.

239
Madras High Court : हिंदुनाच हिंदू मंदिरात प्रवेश, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
Madras High Court : हिंदुनाच हिंदू मंदिरात प्रवेश, मद्रास हायकोर्टाचा निर्णय

मंदिराच्या ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करू नये, हे काय पिकनिक स्पॉट नाही, असे मद्रास हायकोर्टाने म्हटलं आहे. तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने (Palani Dandayuthapani Swamy Temple, Dindigul District, Tamil Nadu) हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयाकडे (Madras High Court ) दाखल केली होती.

त्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. मद्रास हायकोर्टाने यासंदर्भात राज्य सरकारला आदेश दिले आहेत. मद्रास हायकोर्टानं मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मदाय यंत्रणेला मंदिरामध्ये बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर हिंदू नसलेल्या व्यक्तींना ‘कोडिमारम’(ध्वजस्तंभ) परिसराच्या पुढे जाण्यास परवानगी नसल्याचं लिहिलेलं असावं. हिंदूंना आपला धर्म माणण्याचं आणि पालन करण्याचा अधिकार असल्याचेही कोर्टानं म्हटले आहे.

(हेही वाचा – RFID System: वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘ही’ यंत्रणा कार्यान्वित होणार, जाणून घ्या… )

दक्षिणेकडील अनेक मंदिरांमध्ये कोडिमारम (ध्वजस्तंभ) उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. यासंदर्भात मंदिरांमध्ये पाट्या लावण्यात याव्यात, असेही कोर्टाने सांगितले आहे. पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी याबाबतचा निर्णय दिला.

याचिकेत काय म्हटलं आहे?
पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिल कुमार यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की,”प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यामध्ये गैर हिंदूंची संख्या मोठी असते. त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे. मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी निकाल दिला.

कोर्टाचे म्हणणे काय?
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी निकाल देताना सांगितलं की, मंदिरात आणि परिसरात गैर हिंदू पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतील तर मंदिर प्रशासानेने खातरजमा करावी. मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वजण भाविकच आहेत का? त्यांची श्रद्धा आहे का ? ते हिंदू धर्मातील परंपरा जपतात का? मंदिराने ठरविलेला पोषाख परिधान केलेला आहे का? हे पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे. जर गैर हिंदूंना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे लागेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.