G-20 Summit : जी-२० परिषदेत भारताला मोठे यश; ‘नवी दिल्ली लीडर्स’ घोषणापत्र मंजूर 

78
G-20 Summit : जी-२० परिषदेत भारताला मोठे यश; 'नवी दिल्ली लीडर्स' घोषणापत्र मंजूर 
G-20 Summit : जी-२० परिषदेत भारताला मोठे यश; 'नवी दिल्ली लीडर्स' घोषणापत्र मंजूर 
देशाची राजधानी नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषद सुरू आहे. (G-20 Summit) दरम्यान, दुपारी स्वत: पंतप्रधान मोदींनी G20 नेत्यांच्या घोषणेवर सर्व देश सहमत झाल्याची माहिती दिली. पीएम मोदी म्हणाले, “सर्वांच्या कठोर परिश्रमाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, जी-२० नेत्यांच्या घोषणेवर एकमत झाले आहे. शेर्पा आणि मंत्री यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले. जी २० घोषणा स्वीकारल्या गेल्या आहेत.” 09 सप्टेंबर रोजी जेव्हा G20 शिखर परिषद सुरू झाली तेव्हा ‘वन अर्थ’ वर सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. यानंतर ‘एक कुटुंब’ या विषयावरील दुसरे सत्र दुपारी ३ वाजता झाले. सायंकाळी ७ वाजता सर्व राज्यप्रमुखांची बैठक होणार आहे. रात्री 8 ते 9.15 या वेळेत त्यांच्यात चर्चा होईल. (G-20 Summit)
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा)

जी-२० नेत्यांच्या घोषणापत्रात काय आहे ? 

1. मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ
2. SDGs वर प्रगतीचा वेग वाढवणे
3. शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करार
4. 21 व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था
5. तांत्रिक बदल आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा
6. आंतरराष्ट्रीय कर आकारणी
7.  लैंगिक समानता आणि सर्व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण
8. आर्थिक क्षेत्रातील समस्या
9. दहशतवाद आणि मनी लाँड्रिंगचा मुकाबला करणे
10. अधिक समावेशी जग तयार करणे

दिल्लीत होत असलेले G20 शिखर संमेलन मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवा मार्ग खुला करणार आहे. भारताकडे या संमेलनाचे अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीकेंद्रित आहे. याठिकाणी दक्षिणेकडील देशांच्या विकास विषयक समस्या सक्रियपणे मांडल्या जात आहेत. या संमेलनात ‘एक पृथ्वी’, ‘एक कुटुंब’ आणि ‘एक भविष्य’ या विषयावरील सत्रे होत आहेत. ज्यात मजबूत, शाश्वत, सर्वसमावेशक आणि संतुलित विकासासह जागतिक समुदायाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचा उहापोह केला जात आहे. मैत्री आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक नेते आणि शिष्टमंडळ प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या जात आहेत. (G-20 Summit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.