PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन भारत दौऱ्यावर आले आहेत.

91
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

एकामागून एक विक्रम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. एकाच पंतप्रधानांच्या काळात अमेरिकेच्या तीन-तीन राष्ट्रपतींनी भारताला भेट द्यावी, असे प्रथमच घडले आहे. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन भारत दौऱ्यावर आले आहेत. जो बायडन यांचे इकडे विमानतळावर स्वागत झाले आणि तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक विक्रम नोंदविला गेला.

त्याचे झाले असे की, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अमेरिकेच्या तीन-तीन राष्ट्रपतींनी भारताला भेट दिली आहे. भारत भेटीवर आलेले जो बायडन हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती होय. यापूर्वी, २०२० मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आले होते. आणि आता बायडन आले आहेत.

(हेही वाचा – G-20 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डिनरला १७० पाहुण्यांची उपस्थिती)

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात ओबामा भारत भेटीवर आले होते. यानंतर दुसऱ्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन आले आहेत. एकाच पंतप्रधानाच्या काळात अमेरिकेच्या तीन वेगवेगळ्या राष्ट्रपतींनी भारत भेटीवर येण्याची ही पहिलीच आणि एकमेव वेळ होय. भारतात सर्वप्रथम येणारे अमरिकेचे राष्ट्रपती म्हणजे डी. आयझेनहॉवर. आयझेनहॉवर डिसेंबर १९५९ मध्ये भारतात आले होते. तेव्हा त्यांनी भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले होते आणि आग्रा येथे ताजमहाल बघायलाही गेले होते. यानंतर जुलै १९६९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन, जानेवारी १९७८ मध्ये जिमी कार्टर, मार्च २००० मध्ये बिल क्लिंटन आणि मार्च २००६ मध्ये जॉर्ज डब्लू बुश यांनी भारत भेटीवर आले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.