पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला फ्रान्सचा ‘हा’ सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

123
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला फ्रान्सचा 'हा' सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला फ्रान्सचा 'हा' सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी (१३ जुलै) रात्री उशिरा पॅरिसमधील राष्ट्रपतींच्या राजवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्वोच्च सन्मान ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत.

भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी पॅरिसला पोहोचले. यानंतर येथील ला सीन म्युझिकलमध्ये भारतीयांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘फ्रान्समध्ये येणे म्हणजे घरी येण्यासारखे आहे. भारतातील लोक जिथे जातात तिथे मिनी इंडिया बनवतात. शरीराचा प्रत्येक कण तुमच्यासाठी आहे. जागतिक व्यवस्थेत भारताची विशेष भूमिका आहे. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताचा अनुभव आणि प्रयत्न जगाला उपयुक्त ठरत आहेत.’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा – दादरमधील ‘त्या’ निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम तोडले, पुन्हा नव्याने करणार काम)

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला होणार २५ वर्षे पूर्ण

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी म्हणजेच बॅस्टिल डेला पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. मोदींच्या आधी २००९ मध्ये मनमोहन सिंग हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले होते. ज्यांना बॅस्टिल डे वर प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दुसरीकडे, संरक्षण परिषदेने भारतीय नौदलाच्या फ्रान्सकडून २६ राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय नौदल स्कॉर्पीन श्रेणीच्या ३ पाणबुड्याही खरेदी करणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.