Pragyan Rover : ‘प्रज्ञान बागडतोय, त्याची आई प्रेमाने पाहत आहे’; इस्रोने शेअर केला प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ

126
Pragyan Rover : 'प्रज्ञान बागडतोय, त्याची आई प्रेमाने पाहत आहे'; इस्रोने शेअर केला प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ

भारताच मिशन चंद्रयान-3 महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. विक्रम लँडर आणि (Pragyan Rover) प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर उतरुन जवळपास आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. इस्रोकडून चंद्रयान बाबत रोज एक नवीन अपडेट मिळत आहे. सध्या लँडर आणि रोव्हर दोघांकडून चंद्रावर मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य सुरु आहे. लँडर आणि रोव्हरने आतापर्यंत केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पुष्ठभागावर आणि जमिनीतच्या आत असलेल्या तापमानात बराच फरक दिसून आला आहे. अशातच आता इस्रोकडून रोव्हरचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

चंद्रावर सध्या प्रज्ञान रोव्हरची (Pragyan Rover) भ्रमंती सुरु आहे. या दरम्यान विक्रम लँडरने एक व्हिडिओ शूट केला आहे. गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी इस्रोने हा व्हिडिओ टि्वट करत सर्वांपर्यंत शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्रावर सेफ रुटच्या शोधात फिरतोय, असं पाहायला मिळत आहे. प्रज्ञान रोव्हरचे हे फिरणं विक्रम लँडरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. एखादं लहान मुल चंद्राच्या अंगणात खेळतय आणि आई त्याच्याकडे बघतेय असा हा व्हिडिओ आहे.

(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्रावर भूकंप ! चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागण्याची शक्यता)

हा व्हिडीओ शेअर करतांना इस्रोने लिहिले की; प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावर बागडत आहे आणि आई (लँडर विक्रम) त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे. तुम्हाला वाटत नाही का?

इस्रोच्या म्हणण्यानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर (Pragyan Rover) मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनदेखील आहेत, तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. प्रज्ञान रोव्हरवरील LIBS पेलोडने हा शोध लावला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.