Petrol-Diesel : पेट्रोल – डिझेलच्या दरात पुन्हा वाढ!

154
Petrol-Diesel : पेट्रोल - डिझेलच्या दरात पुन्हा वाढ!

रशिया युक्रेन युद्धामुळे व्यवहार गती मंदावली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे.

(हेही वाचा – याच साठी केला होता का अट्टाहास? महाराष्ट्र दिनीच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बंद)

अशातच मंगळवार २ मे रोजी देशातील इंधनाच्या किंमती बदलल्या आहेत. त्यानुसार तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. त्यानुसार बिहारमध्ये पेट्रोल (Petrol-Diesel) २५ पैशांनी स्वस्त होऊन १०८.९० रुपये प्रतिलिटर तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त होऊन ९५.५७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४७ पैशांची घसरण झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल १ रुपये आणि डिझेल (Petrol-Diesel) ७८ पैशांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल ४१ पैशांनी वाढून १०६.८५ रुपये तर डिझेल ९३.३५ रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. (Petrol Diesel)

हेही पहा –

महत्वाच्या शहरांमध्ये वाढले दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.