Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, हे कधी तरी होणारच होते

शरद पवार यांनी म्हटले आहे की, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. असे अजित पाटील म्हणाले.

126
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, हे कधी तरी होणारच होते
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, हे कधी तरी होणारच होते

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्ष पदावरील निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी निर्माण झाली. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या भावना मांडताना, वयोमानानुसार हा निर्णय घ्यावाच लागणार, कधी ना कधी हे होणारच होते, पवार यांच्या डोळ्यासमोर जर कुणी अध्यक्ष होणार असेल तर कार्यकर्त्यांना काय अडचण आहे, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी केले.

अजित पवार नेमके काय म्हणाले?

तुम्ही गैरसमज करून घेत आहात की शरद पवारांनी पद सोडले म्हणजे ते बाजूला जातील. पण तसे होणार नाही. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. कोणी येरा गबाळा अध्यक्षांची निवड करणार नाही. शरद पवार यांनी म्हटले आहे की, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिले. कुणी पण अध्यक्ष झाले  प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत. शरद पवार हे सर्व प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवली. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र 1 मे असल्यामुळे झाला नाही. हा दिवस ना उद्या हे होणार होते.

(हेही वाचा ‘शरद पवारांच्या निवृत्तीबाबत समिती निर्णय घेईल’; अजित पवारांची माहिती, पण छगन भुजबळांचा विरोध)

शरद पवार निर्णय मागे घेणार नाहीत – अजित पवार 

सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या आहेत. तुम्ही गैरसमज करुन घेत आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणून पक्षात नाही असे नाही. शरद पवार बाजू जाणार नाहीत. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरु राहिल. कुणी पण अध्यक्ष झाले  प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र स्वतःपासून फिरवून. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी, आमदारकीबाबत सर्व निर्णय त्यांच्याबाबत तेच घेतील. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे रोजी वज्रमूठ सभा असल्यामुळे झाला नाही. आज ना उद्या हे होणार होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.