New Year: नवीन वर्ष सुरू होण्याआधी ‘ही’ कामे तातडीने करा

348
New Year: नवीन वर्ष सुरू होण्याआधी 'ही' कामे तातडीने करा
New Year: नवीन वर्ष सुरू होण्याआधी 'ही' कामे तातडीने करा

नवीन वर्षाचे स्वागत करण्याआधी काही महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक असते. जाणून घेऊया, अशा कामांविषयी ज्या कामांची मुदत नववर्ष सुरू होण्याआधी संपते.

बँक लॉकर करार
सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या कालावधीत ग्राहकाने नूतनीकरण न केल्यास, लॉकर गोठू शकते. ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करार सादर केला आहे. त्यांना सही करावी लागेल.आरबीआयने ऑगस्ट 2021 मध्ये बँक लॉकर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. याअंतर्गत लॉकर ग्राहकांच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीवर बँक लॉकर करार तयार करण्यात आला आहे. ग्राहकांना या करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी 2022 मध्येच या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांना सुधारित करारावर स्वाक्षरी करून तो बँकेला द्यावा लागेल. बहुतेक लोक त्यांच्या बँक लॉकरमध्ये दागिने आणि आवश्यक कागदपत्रे इत्यादी ठेवतात.

(हेही वाचा – PM Narendra Modi अचानक एका गरीब कुटुंबाच्या घरात गेले, चहा प्यायले आणि गप्पा मारत बसले)

ITI दाखल करण्याची अंतिम मुदत
ज्या करदात्यांनी 2022 ते 2023 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची 31 जुलैची अंतिम मुदत चुकवली आहे, त्यांना आयकर विभागाने आठवण करून दिली आहे. करदात्यांसाठी उशिरा आयटीआय भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, आयटीआर दुरुस्तीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.

UPI आयडी निष्क्रिय केला जाईल
NPCE ने पेमेंट अॅप्सना एक वर्षाहून अधिक काळ वापरात नसलेले UPI आयडी ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यास सांगितले आहे. म्हणजेच तुमचा UPI सक्रिय नसेल तर तो निष्क्रिय होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.