New Year: २०२४ साठी संकल्प करणार आहात का? ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

एखादी वाईट सवय सोडण्याऐवजी तिच्या जागी नवीन सवय लावण्याचा संकल्प अधिक फायदेशीर ठरू शकतो.

200
New Year: २०२४ साठी संकल्प करणार आहात का? 'या' टिप्स लक्षात ठेवा
New Year: २०२४ साठी संकल्प करणार आहात का? 'या' टिप्स लक्षात ठेवा

स्वत:ला सुधारण्यासाठी, नवीन छंद जोपासण्यासाठी, वेळ सत्कारणी लागण्यासाठी बरेच जण काही ना काही संकल्प नवीन वर्षाच्या (New Year) सुरुवातीला करतात, मात्र अनेक वेळा हे संकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली जाते, पण काही काळाने ते अर्धवट राहतात. (New Year 2024 Resolution)अशा वेळी स्वत:लाचा त्रास होते. त्यामुळे संकल्प करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, जाणून घेऊया.

वाईट सवयी सोडण्याचा संकल्प…
बाहेरचं जंक फूड खाणे सोडण्याऐवजी सकस आणि योग्य आहार घेण्याचा संकल्प तुम्ही नवीन वर्षात करु शकता. धुम्रपान, मद्यपान किंवा जास्त जंक फूड खाणे यासारख्या अनेक वाईट सवयी आहेत, ज्यांना लोक सोडून देण्याचा निर्णय घेतात पण ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे एखादी वाईट सवय सोडण्याऐवजी तिच्या जागी नवीन सवय लावण्याचा संकल्प अधिक फायदेशीर ठरू शकतो. याकरिता डॉक्टरांची मदत घेता येऊ शकते.

(हेही वाचा – Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा )

वजन कमी करण्याचा संकल्प
वजन कमी करण्याऐवजी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा. त्यामुळे आहार, झोप, खाणे यावर लक्ष केंद्रित करता येईल.

यश मिळवण्याचा संकल्प
नवीन वर्षात प्रत्येक कार्यात यश मिळवण्याचा संकल्प करण्याची चूक करू नका. काही जण नववर्षाच्या उत्साहाच्या भरात नवीन वर्षात जे करू त्यात यशस्वी व्हायलाच हवे, असा संकल्प करतात. यामुळे काही वेळा मानसिक दबाव येण्याचीही शक्यता असते. संकल्पाच्या अट्टाहासामुळे ताण येईल, असे संकल्प करण्यापेक्षा सकारात्मक राहण्यासाठी मदत होईल, असे संकल्प करा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.