जवळ घेत नाही, म्हणून राग अनावर; संतापलेल्या नवऱ्याने बायकोच्या डोक्यात घातला पाटा अन्…

139

बायको जवळ घेत नाही, जवळ झोपू देत नाही म्हणून राग अनावर झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडमधील मालवणी या भागात घडला आहे. दगडाचा पाटा डोक्यात घालून नवऱ्याने आपल्या बायकोचा जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

(हेही वाचा – ‘या’ वेळेस चुकूनही पिऊ नका Green Tea, फायद्याऐवजी होईल तोटा!)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १५ जुलैच्या रात्री घडलेली ही घटना आता उघडकीस आली. बायको जवळ झोपू देत नाही म्हणून पती आणि पत्नीत वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की संतापलेल्या पतीने दगडाचा पाटा उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

काय घडला प्रकार

मालवणीच्या यशोदिप को ऑप सोसायटी, अंदा कॉलनी गेट नं ८ येथे ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री ४८ वर्षीय ज्ञानोबा बलाडे हा पत्नीच्या शेजारी झोपायला गेला असता. पत्नी त्यास आपल्याजवळ झोपू देत नव्हती. यावेळी दोघांत भांडण झालं. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने ज्ञानोबा बलाडे याने दगडाचा पाटा पत्नी विजयमालाच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. या प्रकरणी ज्ञानोबा बलाडे याला पोलिसांनी पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. तर मृत विजयमाला हिता मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.