बहुआयामी अभिनेत्री Savitri Ganesan

167
सावित्री गणेसन (Savitri Ganesan) यांचा जन्म ६ जानेवारी १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील मदुरस प्रेसिडेन्सी, गुंटूर जिल्ह्यातील चुर्रुरू येथे झाला. त्या सहा महिन्यांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने सावित्री आणि मोठ्या भावाला मारुतीला, काकू आणि काकांकडे राहायला नेले. कॉम्रेड वेंकटरामय्या चौधरी हे त्यांचे काका होते व त्यांनी सावित्रीचे नृत्य पाहिले आणि त्यांना नृत्य प्रशिक्षण वर्गात घातले.
सावित्रीने १९५२ मध्ये तमिळ अभिनेता मिथुन गणेशशी लग्न केले. या लग्नामुळे त्याच्या काकांशी कायमचे मतभेद निर्माण झाले कारण गणेश यांचे आधीच लग्न झाले होते व त्यांना चार मुली होत्या. सावित्री (Savitri Ganesan) ह्या अभिनेत्री, पार्श्वगायिका, नृत्यांगना, दिग्दर्शक आणि निर्मात्या होत्या. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
सावित्री तेलुगू सिनेमातील सर्वोत्कृष्ट आणि महान कलाकार होत्या. मात्र पुढे त्यांनी मद्यपानाशी मैत्री केली आणि त्यांना आर्थिक समस्याही सतावू लागली. त्यामुळे त्यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. तीन दशकं त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली असून सुमारे २५० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.
सावित्री चित्रपट क्षेत्रात कार्यरत होत्याच त्या़चबरोबर सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचा वावर होता. त्यांना १९९९ मध्ये ३० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “वुमन इन सिनेमा” विभागात “अ मून अमंग स्टार्स” सन्मान मिळाला. सावित्री यांच्या जीवनावर आधारित महानती हा चित्रपट २०१८ मध्ये आला.  या चित्रपटाने मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात “Equality in Cinema Award” हा पुरस्कार प्राप्त केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.