Most Powerful Passport 2024 : फ्रान्सचा पासपोर्ट सगळ्यात तगडा, काय आहे भारताचा नंबर?

180
Most Powerful Passport 2024 : फ्रान्सचा पासपोर्ट सगळ्यात तगडा, काय आहे भारताचा नंबर?
Most Powerful Passport 2024 : फ्रान्सचा पासपोर्ट सगळ्यात तगडा, काय आहे भारताचा नंबर?

ऋजुता लुकतुके

तुमच्या देशाच्या पासपोर्टवर (Most Powerful Passport 2024) तुम्हाला किती देशांत व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकतो यावर त्या देशाचं भूराजकीय महत्त्व अधोरेखित होत असतं. आणि ही त्या देशाची ताकदही मानली जाते. या निकषांवर २०२४ मध्ये फ्रान्सचा पासपोर्ट(French passport) सगळयात ताकदवान ठरला आहे. कारण फ्रेंच पासपोर्ट(Most Powerful Passport 2024) असेल तर तुम्ही १९४ देशांमध्ये विनासायास फिरू शकता. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हे मानांकन ठरवत असतो.

(हेही वाचा- Delhi Chalo March : केंद्रसरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिलं ५ कलमी आश्वासन )

जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन हे इतर देश फ्रान्सच्या पाठोपाठ या यादीत आघाडीवर आहेत. २०२३ मध्ये भारतीय पासपोर्टवर(Indian passport) ६२ देशांत व्हिसाविना प्रवेश मिळू शकत आहे. भारताची मात्र पासपोर्ट(Most Powerful Passport 2024) इंडेक्समध्ये एका स्थानाने घसरण होऊन ८५ वं स्थान मिळालं आहे.

मॉलदीव्ज देश या इंडेक्समध्ये ५८व्या स्थानावर आहे. तर भारताचा शेजारी देश पाकिस्तान १०६ व्या स्थानावर आहे. (Most Powerful Passport 2024)

(हेही वाचा- Arvind Kejriwal ईडीच्या सहाव्या समन्सलाही गैरहजर )

अमेरिका या यादीत सहाव्या स्थानावर आहे. इंटरनॅशनल एअर टान्सपोर्ट अथॉरिटीकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हेन्ली कंपनी १९ वर्षांच्या डेटाचा आधार घेऊन दरवर्षी पासपोर्ट(Most Powerful Passport 2024) इंडेक्स बनवत असते. २२७ जागांचे १९९ पासपोर्ट गृहित धरुन हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे.

हा इंडेक्स दर महिन्याला अपडेट केला जातो. अलीकडे जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने व्हिसाचे नियम बदलत आहेत. २००६ साली सरासरी ५८ देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करता येत होता. हळू हळू हा आकडा १११ देशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तगड्या पासपोर्टचे निकषही बदलले आहेत.(Most Powerful Passport 2024)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.