Jayant Patil भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा, व्यक्त केली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

187
Jayant Patil भाजपात प्रवेश करणार असल्याची, व्यक्त केली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Jayant Patil भाजपात प्रवेश करणार असल्याची, व्यक्त केली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (Nationalist Sharad Chandra Pawar group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार, असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

(हेही पहा – Most Powerful Passport 2024 : फ्रान्सचा पासपोर्ट सगळ्यात तगडा, काय आहे भारताचा नंबर? )

मात्र यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी ‘काही कुठे येणार नाही आणि जाणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.’
त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांनी राज्यसभेची उमेदवारीदेखील देण्यात आली. महाविकास आघाडीतून एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता, कुठेही येणार नाही, अन् कुठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.