Delhi Chalo March : केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिलं ५ कलमी आश्वासन

284
Farmer Protest : सरकारचा प्रस्ताव मान्य होईना; बॅरिकेट्स तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आणले JCB
Farmer Protest : सरकारचा प्रस्ताव मान्य होईना; बॅरिकेट्स तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आणले JCB

ऋजुता लुकतुके

केंद्रीय मंत्रांच्या (Delhi Chalo March) एका समितीने सोमवारी (१९ फेब्रुवारी) आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबरोबर ५ तास चर्चा केली. आणि यात सरकारने डाळी, मका आणि कापूस ही पीकं पुढील ५ वर्षं किमान हमी दराने खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी आपली चलो दिल्ली ही घोषणा काही काळासाठी स्थगित केली आहे.

केंद्र सरकारकडून (Delhi Chalo March) केंद्रीय कृषि (Central Agriculture) व शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा(Arjun Munda), वाणिज्यमंत्री पियुष गोयल(Piyush Goyal), गृहराज्यमंत्री नित्यानंद राय(Nithyananda Rai) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhagavanta mana) यांनी वाटाघाटी केल्या. रविवारी संध्याकाळी सव्वासहाला सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री दीड वाजता संपली. (Delhi Chalo March)

(हेही वाचा- Mustafizur Head Blow : बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिझुर डोक्याला चेंडू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल )

वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी सकाळी दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या मुद्यावर सहमती झाल्याचं जाहीर केलं. आपल्या महत्त्वाच्या ५ मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी १२ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केलं होतं. (Delhi Chalo March) आणि चलो दिल्लीची हाक दिली होती. पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर या जमावाला अडवल्यानंतर पंजाब आणि हरयाणाच्या शंभू तसंच खनोरी सीमांवर शेतकरी तळ ठोकून होते.(Delhi Chalo March)

(हेही वाचा- Arvind Kejriwal ईडीच्या सहाव्या समन्सलाही गैरहजर )

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, कृषि मालाला किमान हमीभाव आणि शेतकरी तसंच शेतमजूरांना निवृत्तीवेतनाची तरतूद अशा त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. (Delhi Chalo March)

संयुक्त शेतकरी मोर्चाने सध्या आंदोलन स्थगित केलं असलं तरी २२ फेब्रुवारीला शेतकरी संघटनांची बैठक बोलावली आहे. आणि यात किमान हमी भावाचं गणित काय असावं यावर चर्चा होणार आहे. (Delhi Chalo March) शेतकऱ्यांना मान्य होईल असा फॉर्म्युला ठरल्याशिवाय आंदोलन पूर्णपणे मागे घेणार नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. (Delhi Chalo March)

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या आधी झालेल्या ३ बैठका निष्फळ ठरल्या होत्या. (Delhi Chalo March)

हेही पहा-

https://www.youtube.com/watch?v=cluTgAZyDSI

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.