पुलांसदर्भात आता अ‍ॅप देणार माहिती; अमेरिकेत महत्त्वाचे संशोधन

109

जगभरात पुलांसदर्भात दुर्घटना सातत्याने घडत असतात. नुकताच गुजरातमध्ये मोरबी येथील झुलता पूल कोसळून सुमारे 134 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी आहे. आता जगातील कोणताही पूल व्यवस्थित आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी स्मार्टफोन अॅप्लिकेशन असू शकते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

नवीन अभ्यासानुसार, वाहनांमध्ये ठेवलेल्या विशेष साॅफ्टवेअरसह सुसज्ज मोबाईल फोन पूल ओलांडताना उपयुक्त संरचनात्मक माहिती गोळा करु शकतात.

अभ्यासक कार्लो रत्ती म्हणतात, पुलांच्या संरचनात्मक आरोग्याविषयी स्मार्टफोनने मिळवलेली माहिती, डेटामधून काझली जाऊ शकते. हे संशोधन काही प्रमाणात येथील गोल्डन गेट पुलावरच करण्यात आले. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील संशोधकांचा समावेश असलेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पुलाचे सेन्सर ज्याप्रमाणे हाद-यांचा डेटा संकलित करतात, त्याचप्रमाणे मोबाईल अॅपही ही माहिती मिळवू शकते.

( हेही वाचा: राज्यात थंडी वाढतेय; काय खावे काय टाळावे? )

पुलांचे आयुष्य 30 टक्के वाढू शकते

  • मोबाईल अॅपच्या असा सततच्या देखरेखीतून मिळालेल्या डेटामुळे पुलाचे आयुष्य 16 ते 30 टक्के वाढू शकते.
  • स्मार्टफोनद्वारे संकलित केलेला प्रचंड आणि स्वस्त डेटा सध्याची वाहतूक पायाभूत सुविधांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
  • अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी पुलावरुन जाणा-या वाहनांमध्ये ठेवण्यासाठी अॅंड्राॅइड आधारित मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. संशोधकांनी मिळवलेला डेटा आशादायक आणि अचूक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.