Shri Krushna : मन करा रे सक्षम! जाणून घ्या श्रीकृष्णाचे जीवनाविषयी सकारात्मक उपदेश

277
Empower Your Soul: Top Positive Krishna Quotes on Life: भगवान कृष्ण (Shri Krushna) म्हणजे जगाचा गुरु. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगून जगावर केवढे तरी मोठे उपकार केले आहेत. लोक भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात, तर कुणी त्याच्या निस्सिम प्रेम करतं, भक्त कोणत्याही मार्गाने,  भावनेने भगवान श्रीकृष्णाची सेवा करतो, भक्ती करतात. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने भक्तांना जगातील सर्व सुख प्राप्त होते.
कृष्ण (Shri Krushna)  हा सर्व सुखांचा उगम आहे आणि तो सर्व कारणांचं प्रमुख कारण आहे. कृष्ण हा प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे… कृष्ण सगळीकडे आहे. कृष्णाला आरंभ, मध्य किंवा अंत नाही. कृष्ण हाच सगळं काही आहे. आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचे सकारात्मक विचार (Krishna Quotes) अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहोत. जाणून घेऊया काय आहेत कृष्णासंबंधी जीवनाविषयी सकारात्मक विचार (positive krishna quotes on life):
कृष्ण म्हणतात:
“वेळ कधीही सारखी नसते,
जे इतरांना विनाकारण रडवतात
त्यांना रडावंच लागतं.”
बालकृष्ण म्हणतो:
मी सर्वांचं ऐकतो.
पण माझं कोण ऐकतं,
जेव्हा एखादी व्यक्ती चुकीचे कृत्य करते
तेव्हा ती डावीकडे, उजवीकडे, पुढे आणि मागे पाहतो.
फक्त वर बघायला विसरते.
मनाविषयी भगवंत म्हणतात:
“मनापेक्षा सुपीक जागा दुसरी नाही,
कारण तिथे जी भावना व्यक्त केली जाते,
“विचार”, “द्वेष” किंवा “प्रेम” असो,
ती निश्चितपणे वाढत जाते.
चमत्काराबद्दल सुंदर वचन:
“चमत्कार फक्त त्यांच्यासोबतच घडतात,
“ज्यांच्या अंतःकरणात विश्वास असतो.”
सुंदर उपदेश:
मी सर्व प्राणीमात्रांकडे समान पद्धतीने पाहतो,
माझ्यासाठी कोणीही लहान किंवा मोठा नाही,
परंतु जे माझी प्रेमाने पूजा करतात.
ते माझ्या आत राहतात
आणि मी त्यांच्या आयुष्याचा भाग होतो.
अडचणींचा सामना कसा कराल?
“अडचणी फक्त सक्षम लोकांच्याच आयुष्यात येतात,
कारण अडचणींचा सामना करण्याची क्षमता फक्त त्यांच्यात असते.
तुम्हाला भगवान कृष्णाचे मार्गदर्शनपर सकारात्मक विचार कसे वाटले. आम्हाला जरुर कळवा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.