टॅक्सीचालक ते सक्षम विद्रोही कवी Namdeo Dhasal

259

नामदेवराव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा जन्म १९४९ साली पुण्यातील खेड तालुक्यात झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. म्हणून ते लहान असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईत राहायला आलं. त्यांचे वडील खाटीक होते. मोठे झाल्यावर नामदेव ढसाळ यांनी अनेक वर्ष मुंबईत टॅक्सी चालवली.

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) हे खूप प्रभावित झाले होते. त्यांनी आपल्या कवितांतून आणि स्तंभलेखनांमधून आंबेडकरांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रचार केला. नामदेव ढसाळ यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दलितजनांच्या समस्यांना, व्यथांना जगासमोर मांडले.

नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) हे दलित पँथर या संघटनेचे संस्थापक होते, तसेच अध्यक्षही होते. या संघटनेची स्थापना १९७२ साली ढसाळ यांनी आपल्या समवयस्क साहित्यिक मित्रांसोबत एकत्र येऊन केली. नामदेव ढसाळ यांनी अमेरिकेतील ब्लॅक पँथर या चळवळीमुळे प्रभावित होऊन आपली दलित पँथर ही संघटना स्थापन केली. या संघटनेअंतर्गत ढसाळ यांनी दलितांच्या हितासाठी अनेक आंदोलने केली आणि त्या काळच्या सरकरला दलितांच्या फायद्यासाठी अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले.

(हेही वाचा : NCP : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचे काय होणार? १५ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महत्वाचा निकाल देणार)

नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) १९६० सालच्या नंतरच्या दशकांमधल्या कवींपैकी प्रमुख कवी मानले जातात. त्यांनी आपल्या कवितांमधून विशिष्ट प्रकारच्या भाषाशैलीने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. साहित्य क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल दरवर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्याकडून ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. २०१४ सालापासून नामदेव ढसाळ यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या नावाचा शब्द पुरस्कार दिला जातो.

नामदेव ढसाळ यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी:

  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार – १९७२
  • सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार – १९७५-७६
  • महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार – १९८३
  • पद्मश्री पुरस्कार – १९९९
  • बहिणाबाई चौधरी पुरस्कार
  • पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार
  • साहित्य अकादमी स्वर्णजयंती जीवनगौरव पुरस्कार – २००५
  • गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार – २००६
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
  • बुद्ध रोहिदास विचार गौरव – इ.स. २००९

नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) स्मृती गौरव समितीच्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जातो. २०१६ साली हा पहिला पुरस्कार मिळवण्याचा मान आंबेडकरी कवी लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता. आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष नामदेव ढसाळ हे एका गंभीर आजाराने पीडित होते. त्यातच त्यांना कॅन्सरही झाला होता. १५ जानेवारी २०१४ साली त्यांचं निधन झालं आणि एक चळवळ थांबली…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.