Make Sure Gandhi Is Dead : रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ पुस्तक जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज यांना दिले भेट

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रणजित सावरकर यांच्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकाचे प्रकाशन २९ जानेवारी रोजी 'इकॉनॉमिक टाइम्स'चे माजी संपादक, तसेच राजकीय तज्ज्ञ राजीव सोनी आणि प्रख्यात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

275
Make Sure Gandhi Is Dead : रणजित सावरकर लिखित 'मेक शुअर गांधी इज डेड' पुस्तक जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज यांना दिले भेट

मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या ही मुळात नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीने झालीच नाही, ती त्याच वेळी दुसऱ्या कुणाच्या तरी बंदुकीच्या गोळीने झाली आहे, असा सप्रमाण दावा करणारे पुस्तक वीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘मेक शुअर गांधी इज डेड‘ (Make Sure Gandhi Is Dead) या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वती जी महाराज यांना भेट देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर)

द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज यांनाअनिल त्रिवेदी भेटले असता त्यांनी त्यांना हे प्रदान देवून इतिहासातील एक महत्त्वाचे गूढ उकलणाऱ्या या पुस्तकाची माहिती दिली. यावेळी सुबोध शर्मा, राजीव सोनी, अनुराग त्रिपाठी, अनिल गलगली (Make Sure Gandhi Is Dead) उपस्थित होते.

New Project 16

(हेही वाचा – LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर)

२९ जानेवारीला झाले पुस्तकाचे प्रकाशन – 

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रणजित सावरकर यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ (Make Sure Gandhi Is Dead) या पुस्तकाचे प्रकाशन २९ जानेवारी रोजी ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे माजी संपादक, तसेच राजकीय तज्ज्ञ राजीव सोनी आणि प्रख्यात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रणजित सावरकर यांनी, ‘गांधीजींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे यांना फाशी देणे, हे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच रामाच्या नावाखाली घडलेलं मोठं पाप आहे. जे पाप या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. प्रभु श्रीराम अयोध्येत आले आहेत. त्यांच्या येण्यासोबत हे पापही उघड झाले आहे’, असे म्हटले होते. गांधींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला शासनाने योग्य सुरक्षा का पुरवली नाही, हे एक कोडे आहे. ते सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कपूर कमिशनमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्यात आली होती. ती थांबविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली सात वर्षे संशोधन करत आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की, नथुराम गोडसे यांना फक्त निमित्तमात्र करण्यात आले आहे. मुळात हत्या दुसऱ्या कुणीतरी केली असण्याची पूर्ण शक्यता आहे, असेही सावरकर म्हणाले होते. (Make Sure Gandhi Is Dead)

New Project 17

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.