Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर

119
लखनौ येथे म्हणजेच लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना - रणजित सावरकर
लखनौ येथे म्हणजेच लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना - रणजित सावरकर

२३ जानेवारीला सकाळी हॉटेलबाहेरून सैनिकी संचालनाचा आवाज आला. हे सैनिकी संचलन म्हणजे अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर लक्ष्मणाच्या नगरीत (Lucknow) प्रभु रामचंद्राला (Ayodhya Ram Mandir) दिलेली शक्तिवंदनाच होती. या संचलनात केवळ सैन्यदले अथवा पोलीस सामील नव्हते, तर हजारोंच्या संख्येने युवक वर्ग शिस्तबद्ध संचलन करीत सहभागी झाला होता. राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (veer savarkar) महामंत्राने आज 85 वर्षांनंतर मूर्त रूप धारण केले आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी म्हटले आहे.

New Project 6 2

(हेही वाचा – Dolarai Mankad : सौराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु साहित्यिक डोलाराय मांकड)

रणजित सावरकर पुढे म्हणाले की, अयोध्येत बघितलेल्या अफाट जनसागराची भक्ती केवळ आध्यात्मिक नव्हती, तर तिचे राष्ट्रभक्तीत झालेले रूपांतर प्रत्यक्ष बघितले. भक्ती असो व राष्ट्रभक्ती, सैनिकी सामर्थ्याशिवाय ती पांगळीच असते. पाचशे वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचे मंदिर उध्वस्त झाले; कारण आम्ही आमची सैनिकी क्षमता गमावली होती.

New Project 7 2

आज भारत (India) पुन्हा समर्थ आणि संपन्न होत आहे. म्हणूनच प्रभु रामचंद्राला मानवंदना देण्यासाठी लक्ष्मणाच्या नगरीत म्हणजे लखनऊमध्ये होत असलेले सैनिकी संचलन हे आपल्या शत्रूला देण्यात येणारा इशाराच आहे.

New Project 8 3

आम्हाला शांती नेहमीच प्रिय आहे आणि ती प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्यही आमच्यात आहे, हाच तो संदेश आहे. भक्ती कडून शक्तीकडे होत असलेला आमचा प्रवास हाच आमचे स्वातंत्र्य, संस्कृती, आस्था आणि विचार अबाधित ठेवण्याचा मार्ग आहे. (Ranjit Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.