रायगड जिल्ह्यात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

93

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या तुकडीचे प्रमुख बी महेशकुमार व त्याच्या सहकारी जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला.

या दोन तुकडीत ५० जवानांचा समावेश

एनडीआरएफच्या या दोन तुकडीत प्रत्येकी २५ असे मिळून एकूण ५० जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करणार असल्याची माहिती मिळतेय. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, पनवेल, पेण, मुरूड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील २६ गावातील रहिवाशांचे स्थलांतरण करण्यात आले आहे, तर रायगड जिल्ह्यातील १ हजार ७१६ रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.

(हेही वाचा – NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य उत्तम प्रकारे करतील, त्यामुळे रायगडकरांनी विशेषतः महाडकरांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, एनडीआरएफ पथकाचे निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.