Maharashtra Government चा अजब शासन निर्णय; महाविद्यालयांनी मतदार नोंदणी करावी, विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी

या माध्यमातून देशभरातील प्रत्येक विद्यार्थ्याला वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तत्काळ मतदार ओळखपत्र देण्याचे भारत निवडणूक आयोगाचे महत्त्वाकांक्षी उदिष्ट पूर्ण करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करावी, अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.

161
Maharashtra Government चा अजब शासन निर्णय; महाविद्यालयांनी मतदार नोंदणी करावी, विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी
  • सुजित महामुलकर

राज्य शासनाने राज्यातील महाविद्यालयांना कामाला लावले असून कनिष्ठ व तत्सम महाविद्यालयांमध्ये (Colleges) शिक्षण घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांची निवडणूक मतदार यादीत (Election Voters List) नाव नोंदणी करून महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेला एकही विद्यार्थी मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याबाबत संस्थात्मक योजना करावी, तसेच विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ (Oath) द्यावी, अशी मार्गदर्शक तत्वे (Guidelines) शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) सर्व महाविद्यालयांना दिली आहेत. (Maharashtra Government)

मतदार नोंदणी करून घ्यावी

याबाबत आज बुधवारी शासन निर्णय जारी केला असून विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या टप्प्यापासूनच त्यांची मतदार नोंदणी करून घ्यावी असे या शासन निर्णयात नमूद केले आहे. तसेच या माध्यमातून देशभरातील प्रत्येक विद्यार्थ्याला वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तत्काळ मतदार ओळखपत्र (Voters Identity Card) देण्याचे भारत निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करावी, अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. (Maharashtra Government)

(हेही वाचा – Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा)

तरुणांमध्ये निवडणूक सहभाग वाढवणे

या चार पानी शासन निर्णयात पुढे म्हटले आहे, “कनिष्ठ व तत्सम महाविद्यालयांमध्ये तरुण मतदार मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. या तरुण मतदाराला देशाच्या, राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याचा मार्ग म्हणजे त्यांची मतदार यादीत नोंद करणे आणि त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करणे, देशाच्या निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक साक्षरता कार्यक्रम राबवण्यासंबंधी शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग व केंद्रीय उच्च शिक्षण विभाग आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. या कराराच्या अनुषंगाने मतदारांना माहिती देणे आणि विशेषतः तरुणांमध्ये निवडणूक सहभाग वाढवणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ आणि तत्सम महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता कार्यक्रम राबवण्याबाबत कळविण्यात आले आहे. यानुषंगाने राज्यातील सर्व कनिष्ठ आणि तत्सम महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता कार्यक्रम राबवण्याबाबत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे,” असे शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. (Maharashtra Government)

(हेही वाचा – Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला)

विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी

नव/भावी मतदारांसाठी कनिष्ठ व तत्सम महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळांची (Electoral Literacy Clubs-ELCs) स्थापना करावी. यासोबतच निवडणूक साक्षरता मंडळांचे उपक्रम राबवण्यासाठी अशा मंडळांच्या कॅम्पस अॅम्बेसेडरची अर्थात सदिच्छादूताची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षित करावे, विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी, अभिरूप मतदान (Mock Election) उपक्रमाचे आयोजन करावे, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (Electronic Voting Machine EVM) आणि मतदारांच्या पडताळणीसाठीचे मतदान पावती यंत्र (Voter Verifiable Paper Audit Trall-WPAT) यांची प्रात्यक्षिके आयोजित करावीत, विद्यार्थ्यांना भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी तयार केलेल्या मोबाइल अॅप्सची माहिती द्यावी, निवडणूक यंत्रणा आणि व्यवस्था याविषयीचे शिक्षण आणि प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करू शकतील, अशा स्पर्धाचे आयोजन करावे, असे पुढे नमूद केले आहे. (Maharashtra Government)

फलश्रुतीचा सविस्तर अहवाल पाठवावा

नमूद केलेले सर्व उपक्रम, तत्त्वे, सूचना आणि निर्देश यांची अंमलबजावणी करावी. सर्व कनिष्ठ व तत्सम महाविद्यालयांनी हे सर्व उपक्रम तसेच तत्वे, सूचना आणि निर्देश आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाज आणि जबाबदारीचा अविभाज्य भाग बनावेत, यासाठी संबंधित संस्थांना आवश्यक ते निर्देश जारी करावेत. या संपूर्ण उपक्रमाशी संबंधित केलेली अंमलबाजवणी, कार्यवाही; तसेच या संपूर्ण प्रक्रियेतून मिळालेल्या फलश्रुतीचा सविस्तर अहवाल तयार करून शालेय शिक्षम व क्रिडा विभागाला पाठवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.