Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला

शोएब पाकिस्तानी वंशाचा असल्यामुळे त्याला व्हिसा देण्यात भारताने दिरंगाई केल्याचा इंग्लिश क्रिकेट संघाचा आरोप होता. 

151
Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला
Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर (Shoaib Bashir) अखेर मंगळवारी संध्याकाळी दुसऱ्या कसोटीसाठी विशाखापट्टणमला दाखल झाला. येत्या शुक्रवारी दुसरी कसोटी तिथे सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाने २८ धावांनी निसटता विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटीत बशीर (Shoaib Bashir) खेळू शकला नव्हता. कारण, भारतीय व्हिसा वेळेवर न मिळाल्यामुळे त्याला लंडनला परतावं लागलं होतं. (Shoaib Bashir Reaches India)

२० वर्षीय बशीर (Shoaib Bashir) पाकिस्तानी वंशाचा आहे. आणि भारतीय दौऱ्याच्या सुरुवातीला इंग्लिश संघ दुबईत सराव करत असताना इतर खेळाडूंना भारतीय व्हिसा मिळाला. पण, बशीरला मिळाला नव्हता. तसंच त्याला लंडनमध्ये भारतीय दूतावासात भेट देण्यास सांगण्या आलं. त्यामुळे इंग्लंडमध्ये भारतावर बरीच टीका झाली. अगदी पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेऊन परदेशी नागरिकांना भारताने अगत्यशील वागणूक द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. (Shoaib Bashir Reaches India)

(हेही वाचा – Ram Darbar : राम दरबाराचा इतिहास आणि त्याचा सांस्कृतिक प्रभाव)

इंग्लंडने पहिल्या हैद्राबाद कसोटीत ‘हे’ फिरकी गोलंदाज खेळवले

पहिल्या कसोटीला एक दिवस उरला असताना बशीरला (Shoaib Bashir) भारतीय व्हिसा मिळाला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे तो वेळेवर भारतात पोहोचू शकला नव्हता. इंग्लंडने पहिल्या हैद्राबाद कसोटीत टॉम हार्टले, जॅक लीच, रेहान अहमद आणि जो रुट असे ४ फिरकी गोलंदाज खेळवले. पहिल्या डावात जो रुट प्रभावी ठरला. तर दुसऱ्या डावात टॉम हार्टलेनं ६२ धावांत ७ बळी मिळवले. (Shoaib Bashir Reaches India)

आता दुसऱ्या विशाखापट्टणम कसोटीत शोएब बशीर (Shoaib Bashir) निवडीसाठी उपलब्ध असेल. जॅक लीचला पहिल्या कसोटीत गुडघ्याच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. दुखापत घेऊन तो खेळला. त्याच्या ऐवजी आता बशीर खेळू शकतो. बशीरचा (Shoaib Bashir) हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. (Shoaib Bashir Reaches India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.