Madhav Khadilkar: नाट्य प्रयोग पूर्ण करणे हीच वडिलांसाठी खरी श्रद्धांजली ! अभिनेते ओंकार खाडिलकर यांचे होतेय कौतुक

408
Madhav Khadilkar: नाट्य प्रयोग पूर्ण करणे हीच वडिलांसाठी खरी श्रद्धांजली ! अभिनेते ओंकार खाडिलकर यांचे होतेय कौतुक
Madhav Khadilkar: नाट्य प्रयोग पूर्ण करणे हीच वडिलांसाठी खरी श्रद्धांजली ! अभिनेते ओंकार खाडिलकर यांचे होतेय कौतुक

पार्ल्यातील उत्तुंग सांस्कृतिक परिवाराचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ नाटककार माधव खाडिलकर (Avinash Dharmadhikari) यांचे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. याच दिवशी त्यांचे सुपुत्र ओंकार खाडिलकर यांचा पुणे येथे ‘अनादी मी अनंत मी’ हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रयोग होता. वडिलांच्या निधनाची बातमी दूरध्वनीद्वारे कळल्यावरदेखील त्यांनी नाटकाचा प्रयोग पूर्ण करण्याला प्राधान्य दिले.

अतिशय दु:खद प्रसंगातही स्वातंत्र्यवीरांचे जीवन चरित्र रंगभूमीवर ओंकार खाडिलकर यांनी साकारले. ज्येष्ठ नाटककार माधव खाडिलकर यांनी ‘अनादी मी अनंत मी’ पुन्हा रंगभूमीवर आणले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रखर राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वनिष्ठ विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ओंकार खाडिलकर यांची तळमळ वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही ढळली नाही. ते नाट्य प्रयोग पूर्ण करून अंत्यसंस्काराकरिता मुंबईत परतले.

(हेही वाचा – Delhi Police notice to Atishi : अरविंद केजरीवाल नंतर दिल्ली पोलिसांचा ताफा मंत्री ‘आतिशी’ यांच्या घरी )

यासंदर्भातील सविस्तर पोस्ट शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त निवृत्त पोलीस अधीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘कै. माधवराव खाडिलकर (Madhav Khadilkar) यांनी पुनर्जीवित केलेला “अनादी मी अनंत मी” हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रयोग त्यांचे सुपुत्र ओंकार खाडिलकर हे आज पुणे येथे सादर करणार होते.‌ संपूर्ण तयारी झाल्यानंतर श्री माधवराव खाडिलकर यांच्या निधनाची बातमी त्यांना समजली. संपूर्ण खाडिलकर कुटुंबीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराने भारावलेले आहे आणि त्यांच्या आदर्शावर जगणारे आहे.‌ आशा खाडिलकर यांनी आपल्या सुपुत्राला वडिलांच्या निधनाची बातमी सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाट्यप्रयोग पूर्ण करूनच येण्याची सूचना दिली तसेच त्या त्यास असेही म्हणाल्या की, वडिलांसाठी तीच खरी श्रद्धांजली ठरेल आणि अर्धवट सोडून परत येणे कुणालाच रुचणार नाही. वडिलांच्या निधनाची बातमी समजूनदेखील श्री ओंकार खाडिलकर यांनी ठरवलेला नाट्यप्रयोग पूर्ण केला आणि त्यानंतरच ते मुंबईकरता निघालेले आहेत. ते जेव्हा नाटक सादर करणार होते तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये किती घालमेल चालू असेल याची आपण कल्पना करू शकतो. परंतु जी व्यक्ती सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेली असते तीच व्यक्ती असं काही जगावेगळे काम करू शकते.‌ अशा परिस्थितीमध्ये ओंकार खाडिलकर यांनी हा प्रयोग सादर करून खऱ्या अर्थाने श्री माधवराव खाडीलकर यांना आदरांजली वाहिली आहे.‌

मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशा खाडिलकर यांची भेट घेतली.‌ त्या मनाने अतिशय कणखर आहेत आणि पतीबद्दल त्यांना तीव्र अभिमान आहे. ते त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले. संपूर्ण पार्लेकर खाडिलकर कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.‌ स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारक यांचा विश्वस्त म्हणून मी स्मारकतर्फे देखील कै. खाडीलकर यांना आदरांजली वाहत आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.