Delhi Police notice to Atishi : अरविंद केजरीवाल नंतर दिल्ली पोलिसांचा ताफा मंत्री ‘आतिशी’ यांच्या घरी

गेल्या आठवड्यात केजरीवाल आणि आतिशी यांनी भाजपवर त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. केजरीवाल सरकार पाडण्यासाठी भाजपने आपच्या सात आमदारांना २५-२५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. यानंतर दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दिल्लीत 'ऑपरेशन लोटस 2.0' सुरू केल्याचा आरोप केला.

198
Delhi Police notice to Atishi : अरविंद केजरीवाल नंतर दिल्ली पोलिसांचा ताफा मंत्री 'आतिशी' यांच्या घरी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपला ताफा शिक्षणमंत्री आतिशी (Delhi Police notice to Atishi) यांच्या घरी वळवला आहे. तसेच त्यांना नोटीस देखील बजावली आहे. काल, आतिशी दिल्लीबाहेर होत्या, त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने आतिशी यांना नोटीस बजावली. आम आदमी पक्षाचे सात आमदार मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपावर दिल्ली पोलिसांनी तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.

(हेही वाचा – Ganpat Gaikwad Firing : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करीत आहे; आमदार गणपत गायकवाड यांचा थेट न्यायालयात आरोप)

भाजपने आपच्या सात आमदारांना २५-२५ कोटी रुपयांची ऑफर दिली ?

गेल्या आठवड्यात केजरीवाल आणि आतिशी (Delhi Police notice to Atishi) यांनी भाजपवर त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. केजरीवाल सरकार पाडण्यासाठी भाजपने आपच्या सात आमदारांना २५-२५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. यानंतर दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस 2.0’ सुरू केल्याचा आरोप केला. “त्यांनी गेल्या वर्षी आपच्या आमदारांना पैशाची ऑफर देऊन आमिष दाखविण्याचा असाच प्रयत्न केला होता, परंतु ते अयशस्वी झाले”, असे आतिशी म्हणाल्या.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे मौन)

भाजपने दिल्ली पोलिसांना या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली –

या आरोपांनंतर दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ३० जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आणि आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी (२ फेब्रुवारी) केजरीवाल आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी (Delhi Police notice to Atishi) यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांना नोटीस देण्यात आली नाही, कारण केजरीवाल यांच्या निवासस्थानावरील अधिकाऱ्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला आणि अतिशीदेखील निवासस्थानी उपस्थित नव्हती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.