Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे मौन

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर छगन भुजबळ यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. या विरोधानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

184
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचे मौन

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे सध्या अन्न नागरी पुरवठा हे खातं आहे. तसेच राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांचा हात धरला. पण भुजबळांनी सध्या त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मी ओबीसी समाजासाठी गेली ३५ वर्ष काम करतोय, त्यामुळे समाजासाठी मी राजीनामा देण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.

याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रश्नावर अजित पवारांनी तुर्तास तरी मौन धरलं आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी देणार)

काय म्हणाले भुजबळ?

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. या विरोधानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच “त्यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा”, असे म्हटले. त्यावर भुजबळ यांनी सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या.

(हेही वाचा – World Cancer Day : जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?)

मला लाथा घालायची गरज नाही

काल कोणीतरी बोललं या भुजबळला (Chhagan Bhujbal) लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की, आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आधी राजीनामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.