मॉलमध्ये लव्ह जिहाद? अशा प्रकारे हिंदू मुलींना केलं जातेय ‘टार्गेट’

56

लखनौमधील लुलू मॉलमध्ये नमाज अदा केल्याप्रकरणी, अखिल भारतीय हिंदू महासभेने सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये, असा इशारा दिला आहे. तसेच, या माॅलमध्ये 70 टक्के मुस्मिम मुलांना आणि 30 टक्के हिंदू मुलींना नोक-या देऊन लव्ह-जिहाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा, गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करता येणार नाही, जर लुलू माॅलमध्ये पुन्हा नमाज अदा केली गेली, तर त्याच्या निषेधार्थ आंदोलने केली जातील. तसेच, माॅलमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.

लुलू मॉलवर बहिष्कार टाकण्याची मागणी

हिंदू महासभेने सनातन धर्माच्या लोकांना लुलू मॉलवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची विनंती केली आहे. तसेच, सर्वसामान्यांकडूनही या माॅलवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

( हेही वाचा: धक्कादायक: रेल्वे कॉलनीतील खोल्या परप्रांतीयांना सर्रास भाड्याने दिल्या जातात )

मॉलवर गंभीर आरोप

या माॅलमध्ये 70 टक्के मुस्लिम मुलांना तर 30 टक्के हिंदू मुलींना नोकऱ्या दिल्या जातात. जेणेकरून येथे  ‘लव्ह जिहाद’ सुरू करता येईल, असा गंभीर आरोपही या माॅलवर करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.