धक्कादायक: रेल्वे कॉलनीतील खोल्या परप्रांतीयांना सर्रास भाड्याने दिल्या जातात

90

रेल्वे कर्मचारी-अधिका-यांना एकीकडे हक्काचे रेल्वे निवास मिळवण्यासाठी मुख्यालयात चकरा माराव्या लागत असताना, दुसरीकडे परप्रांतीयांना मात्र अवघ्या 10 हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने रेल्वेची खोली, त्यातच नि:शुल्क वीज आणि पाणी मिळत असल्याची, धक्कादायक माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. हा प्रकार इथेच न थांबता रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात चक्क बेकायदा किराणा दुकानही सुरु झाले आहे. या प्रकाराबाबत काही रेल्वे कर्मचा-यांनी सहायक पोलीस आयुक्तांपासून ते रेल्वे महाव्यवस्थापकांपर्यंत याबाबतची तक्रार केली, परंतु या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप रेल्वे कर्मचा-यांकडून होत आहे.

गेल्या 20 वर्षांपासून येथील खोल्या प्रतिमहिना 10 हजार रुपये दराने भाड्याने देण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप रेल्वे कर्मचा-यांकडून होत आहे. या चाळीत एकूण 50 खोल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने परप्रांतीय घुसखोर वास्तव्य करत आहेत. कर्मचा-यांनी याबाबतची तक्रार सहायक पोलीस आयुक्तांपासून ते रेल्वे महाव्यवस्थापकापर्यंत करुनही या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याची ओरड होत आहे.

( हेही वाचा :शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या पुत्राचा शिंदे गटात प्रवेश )

काय आहे आरोप

सेंट्रल रेल्वे काॅलनीतील चाळ क्रमांक 2,3,4,5,6 आणि 7 मधील सील केलेल्या खोल्यांचे टाळे तोडून त्या सर्रासपणे भाड्याने दिल्या जात आहेत. येथे राहणारे सर्व भाडोत्री व्यसनाधीन, चरस, गांजा आदींचा व्यवसाय करतात. काही रेल्वे अधिका-यांच्या मदतीने काॅलनीत राहणारे कर्मचारी अन्य रहिवाशांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करत आहेत, असे रेल्वे कर्मचा-यांची आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

रेल्वे कर्मचारी स्वत:च्या स्वार्थासाठी सील केलेल्या खोल्या सर्रासपणे परप्रांतीय घुसखोरांना भाड्याने देतात. याबाबत मी अनेकदा तक्रारी केल्या आहेत; मात्र याची दखल घेतली जात नाही- विठ्ठल लवांडे, निवृत्त रेल्वे कर्मचारी, मध्य रेल्वे

सेंट्रल रेल्वे काॅलनीत बेकायदा राहणा-या नागरिकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. – शलभ गोयल, व्यवस्थापक, मध्य रेल्वे

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.