Palghar Rain Updates: अखेर 15 तासांनी पालघरमधील वैतरणेच्या पुरातून 10 कामगारांना वाचवण्यात यश

103

पालघरमध्ये वैतरणा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. या सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मुंबई- बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असताना, अचानक वैतरणा नदीला पूर आल्याने कामगार अडकले होते. अखरे तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच बुधवारी पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात काही कामगार अडकले होते. मुंबई- बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरु होते. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्याने वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्याने ते अडकून पडले. वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या 10 कामगारांची 15 तासांनंतर सुटका करण्यात आली.

( हेही वाचा: अमरावतीत धुमाकूळ घालणा-या कॉलरा आजाराविषयी जाणून घ्या… )

10 कामगारांची सुखरुप सुटका

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. एनडीआरएफची टीम दाखल झाली होती. बचावकार्य तत्काळ सुरु करण्यात आले होते. आधी 6 कामगारांना सुरखरुप बाहेर काढण्यात आले, त्यापाठोपाठ उर्वरित कामगारांना बाहेर काढण्यात यश आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.