उत्तम लाईफ इन्शुरन्स हवाय? तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा

59

देशात डझनभर जीवन विमा कंपन्या आणि शेकडो लाईफ इन्शुरन्स उत्पादने आहेत. यामुळे अनेकांना नेमका कोणता लाईफ इन्शुरन्स योग्य आहे हे ठरवणे कठीण होते. उत्तम लाईफ इन्शुरन्स घेण्यासाठी या बाबींचा विचार करा.

अनेकदा होते फसवणूक

योग्य माहिती नसल्यामुळे लोक चुकीचा विमा खरेदी करतात किंवा एजंटवर विश्वास ठेवून त्याने सांगितलेला विमा निवडतात. मात्र, यात अनेकदा फसवणूकही होते. हे टाळण्यासाठी बाजाराचा थोडा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

तुमच्या हातात 15 दिवसांचा वेळ

सामान्यत: लोक जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी मुख्य वैशिष्ट्यांची कागदपत्रे वाचत नाहीत किंवा समजून घेत नाहीत. पाॅलिसी लागू झाल्यापासून 15 दिवसांमध्ये आपल्याला पाॅलिसी रद्द करण्याचाही अधिकार असतो, हे अनेकांना माहिती नसते.

या कालावधीत पाॅलिसीधारकाला विमा त्यांच्या गरजांसाठी योग्य नाही, असे वाटत असल्यास खरेदी केलेली पाॅलिसी 15 दिवसांच्या आता रद्द करण्याचा पर्याय निवडता येतो.

( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )

कुटुंबाला माहिती द्या

तुमच्या कुटुंबीयांना खरेदी केलेल्या पाॅलिसीची संपूर्ण माहिती द्या, जेणेकरुन कोणतीही घटना घडल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विम्याचा लाभ घेता येईल. सर्व पाॅलिसी कागदपत्रे डिजिटल आणि कागदोपत्री स्वरुपात साठवा, जेणेकरुन गरजेच्यावेळी उपलब्ध होतील.

मोहात पडू नका

तुमची वैयक्तिक माहिती अनेक विमा एजंट आणि कंपन्यांकडे असू शकते. या कंपन्या तुमच्या पाॅलिसीमधील त्रुटी सांगून पाॅलिसी बदलण्याची विनंती करु शकतात आणि विविध प्रकारची प्रलोभने देऊ शकतात. मात्र पाॅलिसी बदलण्याच्या भानगडीत पडू नका.

विमा का आवश्यक आहे?

जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही पाॅलिसी का खरेदी करत आहात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तिला किती रकमेचा विमा आवश्यक आहे. त्याची खर्चाच्या आधारे गणना करा, तो वार्षिक खर्चाच्या किमान 20 पट असावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.