भारतीय दंड विधान कलम ‘३५४’ ची नेमकी व्याख्या काय?

117
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप करून मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले कलम ३५४ वरून राजकीय वादंग सुरू झाले आहेत. या कलमाचा चुकीचा वापर केला जात असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. विनयभंग झालेलाच नसून ही महिला कांगावा करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे.
भारतीय दंड विधान कलम ३५४ नक्की काय आहे? याच पार्श्वभूमीवर विनयभंगाच्या कायद्याचे कलम आणि त्यातील तरतूदी समजून घेऊया…
  • एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना तिच्या शालीनतेचा भंग होईल अशा कृत्यापासून स्त्रीच्या शालीनतेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय दंड विधान कलम ३५४ मध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. स्त्रीचे रक्षण व्हावे यासाठी कलम ३५४  तयार करण्यात आले आहे.
  • कलम – ३५४ म्हणजेच विनयभंग, एखाद्या स्त्रीच्या मनात लज्जा निर्माण होईल किंवा तिला अपमानित करण्याच्या हेतूने गुन्हेगारी बळाचा वापर करून तिच्या शालीनतेला धक्का पोहचेल असे कृत्य करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते व त्याच्या विरुद्ध कलम ३५४ म्हणजेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच, त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला चालवला जातो. या गुन्ह्यात दोषी आढणा-या व्यक्तीला १ ते ५ वर्षापर्यत तुरुंगवासाची तरतूद व दंडाचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.
  • कलम ३५४-अ (लैगिंग छळ) जो पुरुष एखाद्या स्त्रीच्या शरीराला लैगिंग भावनेने स्पर्श करतो, लैगिंग हावभाव करणे, लैगिंग सुखाची मागणी अथवा प्रस्ताव ठेवणे, अश्लील भाषा वापरणे, अश्लील हावभाव करणे अशा व्यक्तिविरुद्ध कलम ‘३५४-अ’ कलमातंर्गत तीन वर्षे तुरुंगवासाची तरतूदीसह द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरतो.

कलम ३५४-  ब – स्त्रीला विवस्त्र करणे

एखाद्या स्त्रीला विवस्त्र करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून तिच्यावर हल्ला करणे किंवा स्त्रिला विवस्त्र करण्यासाठी बळाचा वापर करून प्रवृत्त करणे, अशा गुन्हयात किमान तीन वर्षे ते सात वर्षांपर्यंत कैदेसह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

कलम ३५४ क – कामुकता उत्तेजित करणे

एखाद्या खाजगी कामात लिन असलेल्या स्त्रिला एखादा पुरुष कामुकतेच्या नजरेतून बघत असेल, किंवा तिचे छायाचित्रे काढून चित्रीकरण करीत असेल अशा पुरुषावर ३५४-क अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तसेच, न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीला किमान एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत कैदेसह दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणार हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रम )

कलम ३५४-ड-  पाठलाग करणे
जर कोणताही पुरुष एखाद्या स्त्रिचा पाठलाग किंवा तिला संपर्क करतो, किंवा त्या स्त्रीकडून विरोध असताना वारंवार परस्पर संवाद वाढवण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या स्त्रिच्या इंटरनेट, ईमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संवादाच्या वापराच्या गोष्टीवर निगराणी ठेनत असले, तर कलम 354 ड अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.