ऑस्ट्रेलियात खालिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिराची तोडफोड

107

खालिस्तान समर्थकांनी ऑस्ट्रलियातील प्रसिद्ध श्रीलक्ष्मी नारायण मंदिराची शनिवारी तोडफोड केली. मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले, त्यावेळी त्यांना मंदिराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले.

हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालिका सारा गेट्स म्हणतात की, शिख फॉर जस्टिसच्या धर्तीवर हा द्वेषपूर्ण गुन्हा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना घाबरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे.

( हेही वाचा: बारावीचा गणिताचा पेपर फुटला नाही, त्यामुळे पुन्हा परीक्षा घेणार नाही;शिक्षण मंडळाचा निर्णय )

याआधीही अशाच घटना घडल्यात

याआधी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कॅरम डाऊन भागात असलेल्या श्री शिव विष्णू मंदिर आणि मिली पार्क परिसरातील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. मेलबर्नमधील इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.