ब्राम्हणांचा तुला मत्सर! कोण रे तू? शरद पवारांवरील FB पोस्ट केतकी चितळेला भोवणार, गुन्हा दाखल

123

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या फेसबुक पोस्टने अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फेसबुकवर शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकी ती पोस्ट काय

तुका म्हणे पवारा| नको उडवू तोंडाचा फवारा| ऐंशी झाले आता उरक| वाट पाहातो नरक| सगळे पडले उरले सुळे| सतरा वेळा लाळ गळे| समर्थांचे काढतो माप| ते तर तुझ्या बापाचेही बाप| ब्राम्हणांचा तुला मत्सर| कोणरे तू| तू तर मच्छर| भरला तुझा पापघडा| गप नाही तर होईल राडा| खाऊन फुकटचं घबाड| वाकडं झालं तुझं थोबाड| याला ओरबाड त्याला ओरबाड| तू तर लबाडांचा लबाड| … अशी ही कविता आहे.

( हेही वाचा: मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर )

पवारांच्या कविता वाचनानंतर चितळेची कविता

साता-यामध्ये शरद पवार यांनी जवाहर राठोड यांच्या डोंगराचे ढोल या कविता संग्रहातील पाथरवट ही कविता लोकांसमोर आणली होती. त्यानंतर त्यावर अनेक चर्चा केल्या गेल्या. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळे हिने तुका म्हणे पवारा… ही कविता फेसबुकला शेअर करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.