Kashmiri Hindu : काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात भोगाव्या लागल्या नरकयातना !

185
Kashmiri Hindu : काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात भोगाव्या लागल्या नरकयातना !
Kashmiri Hindu : काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात भोगाव्या लागल्या नरकयातना !

राहुल कौल

जम्मू आणि काश्मीरला (Kashmiri Hindu) विशेष स्वायत्त दर्जा देणारे कलम ३७० हे काश्मिरी पंडितांसाठी (Kashmiri Hindu) एक शाप होते. कलम ३७० मुळे जिहादी आणि फुटीरतावादी मानसिकतेला खत-पाणी घातले गेले. बहुसंख्य स्थानिक तरुणांना शस्त्रे आणि धार्मिक आधारावर उपदेश देण्यात आले. १९९० मध्ये ७ लाख काश्मिरी पंडितांना त्यांच्या मायभूमीतून विस्थापित व्हावे लागले. त्याचा त्यांच्या जीवनावर लक्षणीय आणि दीर्घकालीन परिणाम झाला. जिहाद्यांकडून सतत हिंसाचार, सामूहिक हत्या, बलात्कार आणि धमक्यांचा सामना करावा लागला. काश्मिरी पंडितांना त्यांचा धर्म, श्रद्धा आणि राष्ट्रवादाचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागले.

३ दशकांहून अधिक काळापासून काश्मिरी पंडितांना (Kashmiri Hindu) विस्थापितांचे आयुष्य जगावे लागले. भारताच्या विविध भागांमध्ये राहण्याकरिता त्यांना संघर्ष करावा लागला. निर्वासित म्हणून घरे सोडण्यास भाग पाडले गेलेले बहुसंख्य काश्मिरी पंडित अद्याप परत येऊन काश्मीरमधील त्यांची मालमत्ता आणि सांस्कृतिक वारसा परत मिळवू शकलेले नाहीत. अनेक काश्मिरी पंडितांना नवीन वातावरणात आर्थिक स्थिरता, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक एकात्मतेच्या बाबतीत आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

आता केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर विधानसभेत काश्मिरी पंडितांसाठी २ जागा राखीव ठेवल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही मार्गी लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या निमित्ताने काश्मिरी पंडितांनी एवढी वर्षे जे भोगले, त्याचे हे संक्षिप्त अनुभवकथन…

राजकीय प्रक्रियेतून वगळले

जम्मू आणि काश्मीरची राज्यघटना भारतीय राज्यघटनेपेक्षा वेगळी होती. कलम 370 मुळे स्वतंत्र राज्यघटनेसह राज्याला स्वतःचे कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली. यामुळे काश्मीरमध्ये हिंदूंना राजकीय प्रक्रियेतून वगळण्यात आले.

एकत्रीकरणाच्या प्रयत्नांना अपयश

कलम ३७० द्वारे प्रदान केलेल्या विशेष; परंतु तात्पुरत्या दर्जामुळे राज्यात फुटीरतावादी विचारधारा वाढण्यासाठी आवश्यक असे वातावरण तयार झाले. काश्मिरी पंडित समुदायाला वेगळे पाडण्यात आले. त्यांचे इतर काश्मिरी समाजाशी एकीकरण रोखले गेले. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या आडून फुटीरतावाद्यांमध्ये सांप्रदायिक आणि कट्टरतावादी अजेंडा फोफावला आहे.

(हेही वाचा-Metro Accident : मेट्रो च्या दरवाजात साडी अडकली, अन् घडली दुर्दैवी घटना, नेमके काय घडले )

पुनर्वसनासाठी अडथळा

कलम ३७० मुळे काश्मिरी पंडितांना त्यांच्या मातृभूमीत परतण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या. या तरतुदीमुळे राज्याला विशेष दर्जा मिळाल्यामुळे, जमिनीची मालकी, रोजगाराच्या संधी आणि विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या (Kashmiri Hindu) मालमत्ता पुन्हा मिळवण्यात अडथळे निर्माण झाले. कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये राष्ट्रीय एकात्मता, एकता आणि राष्ट्रवादाची भावना रुजवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाला.

सांस्कृतिक परिणाम

काश्मिरी पंडितांना एक समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनोखी भाषा, कला, संगीत, विधी आणि परंपरा यांचा यामध्ये समावेश आहे. स्थलांतरामुळे सांस्कृतिक परंपरा पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होण्यात अडथळे आले.

आर्थिक आव्हाने

स्थलांतरामुळे काश्मिरी पंडितांच्या आर्थिक स्थिरतेवर लक्षणीय परिणाम झाला. अनेकांनी त्यांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि मालमत्ता गमावल्या. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. या समुदायाला भारताच्या विविध भागांमध्ये नव्याने सुरुवात करावी लागली, अनेकदा रोजगार शोधण्यात आणि नवीन उपजीविकेमध्ये साधन शोधण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागला. याचा परिणाम काश्मिरी पंडितांवर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही झाला. अनेकांनी नुकसान, भीती आणि विस्थापनाची भावना अनुभवली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.

सरकारचे प्रयत्न अपेक्षित

काश्मिर पंडित (Kashmiri Hindu) मातृभूमीतील पुनर्वसनासाठी सरकारकडून आवश्यक असलेल्या प्रयत्नांची वाट पहात आहेत. आजपर्यंत त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत. हा समुदाय न्याय आणि काश्मीर खोऱ्यातील शांतता या अटींवर काश्मीरमध्ये सुरक्षितरित्या परत येण्यासाठी अनुकूल वातावरणाची मागणी करत आहे.

(लेखक ‘युथ फॉर पनून (आमचे) काश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक आहेत.)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.