Jeevan Raksha Padak : महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

200
Jeevan Raksha Padak : महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर
Jeevan Raksha Padak : महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

देशातील 31 व्यक्तिंना राष्ट्रपती यांनी जीवन रक्षा पदक (Jeevan Raksha Padak) श्रृंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन पराक्रमी महिलांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक (Jeevan Raksha Padak) आणि 21 पराक्रमी व्यक्तिांना जीवन रक्षा पदक असा समावेश आहे. यात तीन पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येतील.

जीवन रक्षा पदकासाठी राज्यातून आदिका राजाराम पाटील,  प्रियंका भारत काळे व सोनाली सुनीन बालोडे या तीन महिलांची निवड झाली आहे.

(हेही वाचा – Secular Constitution : निधर्मी, अल्पसंख्यांकवादी ‘सेक्युलर’ संविधान!)

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक (Jeevan Raksha Padak) श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तर देखील दिले जातात.

या पुरस्काराचे स्वरुप (पदक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) पुरस्कार विजेत्याला केंद्रीय मंत्रालय/ संस्था/ राज्य सरकारद्वारे प्रदान केले जातात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.