Israel Hamas War : इस्रायलमध्ये १ लाख भारतीयांना नोकरी मिळण्याची शक्यता

169
Israel Hamas War : इस्रायलमध्ये १ लाख भारतीयांना नोकरी मिळण्याची शक्यता

इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली, त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं.

याच पार्श्वभूमीवर आता इस्त्रायली (Israel Hamas War) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तब्बल १ लाख पॅलेस्टिनी नागरिक जे इस्त्रायलमध्ये कामासाठी होते, त्यांच्या कामावर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इस्त्रायलने भारताकडे तब्बल १ लाख कामगारांची मागणी केली आहे.

पत्रकार आदित्य राज कौल यांनी X वर माहिती दिली की इस्रायलने विद्यमान पॅलेस्टिनी (Israel Hamas War) कामगारांच्या जागी त्वरित 100,000 कामगार देण्यास औपचारिकपणे भारताला सांगितले आहे. मे महिन्यात, इस्रायल आणि भारताने 42,000 भारतीय कामगारांना ज्यू राज्यात काम करण्याची परवानगी देणारा करार केला होता.

(हेही वाचा – Anil Parab : दापोलीचे Sai Resort पाडून टाका; खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश)

इस्रायली बिल्डर्स असोसिएशनचे (Israel Hamas War) उपाध्यक्ष हैम फेगलिन यांनी रोजगार उपक्रमासाठी इस्रायली सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताशी सुरू असलेल्या वाटाघाटी अधोरेखित केल्या. तसेच आम्ही सध्या भारताशी चर्चा करत आहोत. विविध क्षेत्रांमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यात मदत करण्यासाठी भारतातून 50,000 ते 100,000 कामगार आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.

इस्रायली बांधकाम अधिकाऱ्यांनी केलेली विनंती देशातील महत्त्वपूर्ण (Israel Hamas War) क्षेत्रांचे समर्थन करण्यात परदेशी कामगारांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. पॅलेस्टिनी मजुरांच्या अचानक अनुपस्थितीमुळे प्रभावित झालेल्या विविध उद्योगांच्या सातत्य आणि स्थिरतेला चालना देण्यासाठी, लक्षणीय संख्येने भारतीय कामगारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.