Israel-Hamas Conflict : हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला सापडलं नवं हत्यार, कोणतं? वाचा सविस्तर…

इस्त्रायलच्या संरक्षण दलासाठी भुयारं बंद करणं हे मोठं आव्हान आहे.

22
Israel-Hamas Conflict : हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला सापडलं नवं हत्यार, कोणतं? वाचा सविस्तर...
Israel-Hamas Conflict : हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला सापडलं नवं हत्यार, कोणतं? वाचा सविस्तर...

इस्त्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas Conflict) ७ ऑक्टोबरपासून सुरू असून हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल नवनवीन शस्त्रांचा वापर करत आहे. सध्या हमासचा काटा काढण्यासाठी इस्रायल एका नव्या हत्याराचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हमासचे दहशतवादी भुयारात लपून युद्ध करत असल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी एका बॉम्बचा शोध लावला आहे. या बॉम्बमुळे कुठलाही स्फोट होत नाही तसेच आवाजही येत नाही, मात्र तो जिथे फुटतो, तिथे मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण होतो. त्यानंतर तो टणक बनतो. हा बॉम्ब भुयारांमध्ये फुटल्यानंतर तिथल्या वाटा बंद होणार आहेत. याला ‘स्पॉन्ज बॉम्ब’ म्हणतात.

भुयारांमध्ये स्पॉन्ज बॉम्बचा वापर करून हमासची भुयारं बंद करण्याचा विचार निर्णय इस्रायलने घेतला आहे. कारण इस्त्रायलच्या संरक्षण दलासाठी भुयारं बंद करणं हे मोठं आव्हान आहे. कारण भुयारांचा फायदा घेऊन हमासचे दहशतवादी पळून जात आहेत.

(हेही वाचा – Project Kush : इस्रायलसारखे अभेद्य सुरक्षाकवच आता भारतही बनवणार )

स्पॉन्ज बॉम्ब एका प्लास्टिकच्या पिशवीत असतो. त्यात दोन वेगवेगळी रसायनं असतात. ही दोन्ही रसायने धातूची प्लेट किंवा रॉडच्या साहाय्याने केली जातात. रॉड काढल्यानंतर रसायनांची प्रक्रिया होऊन फेसाळता द्रव पदार्थ बाहेर पडतो. हा द्रव हवेच्या संपर्कात येऊन प्रचंड वेगाने सर्वत्र पसरतो. नंतर तो टणक होतो. या फेसामुळे जमिनीखालील भुयारं आणि बोगदे बंद होतात.

भुयारांमध्ये हमासची हत्यारं
भुयारांमध्ये हमासने त्यांची हत्यारं लपवून ठेवली आहेत. तिथूनच ते क्षेपणास्त्र सोडतात. त्यामुळे इस्त्रायल आता प्रत्यक्ष जमिनीवरील कारवाईला सुरुवात करून भुयारं बंद करत आहे.

पहिल्यांदाच स्पॉन्ज बॉम्बचा वापर…
इस्त्रायल पहिल्यांदाच स्पॉन्ज बॉम्बचा वापर करत आहे. हा विशिष्ट प्रकारचा बॉम्ब असून तो फुटला की, मोठ्या प्रमाणात फेस तयार होतो. हा फेस थोड्याच वेळात सिमेंट कॉंक्रिटप्रमाणे घट्ट होतो. त्यातून कुणी बाहेर येऊ शकत नाही तसेच आतही जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे कॉंक्रिट सहज तोडणे शक्य होत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.