Khadakwasla Dam : खडकवासला धरणात महिनाभराचेच पाणी शिल्लक

103
Khadakwasla Dam : खडकवासला धरणात महिनाभराचेच पाणी शिल्लक
Khadakwasla Dam : खडकवासला धरणात महिनाभराचेच पाणी शिल्लक

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १९.५९ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत हा पाणीसाठा १.७४ टीएमसी इतका कमी आहे. (Khadakwasla Dam)

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त दिल्ली पब्लिक लायब्ररीच्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन)

पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७.४५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण २५.५४ टीएमसी इतके होते. गतवर्षीची आजच्या तारखेची आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.९५ टक्के इतका पाणीसाठा कमी झाला आहे. (Khadakwasla Dam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.