Yamaha XSR 155 : यामाहाची आशियात गाजलेली CSR 155 बाईक आता येणार भारतात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

यामाहा कंपनी भारतीय दुचाकी बाजारपेठेत जोरदार मुसंडी घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीची नवी स्ट्रीटबाईक डिसेंबर २०२४ मध्ये लाँच होणार आहे आणि ही बाईक आहे ट्रेंडसेटर. का ते बघूया…

170
Yamaha XSR 155 : यामाहाची आशियात गाजलेली CSR 155 बाईक आता येणार भारतात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Yamaha XSR 155 : यामाहाची आशियात गाजलेली CSR 155 बाईक आता येणार भारतात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
  • ऋजुता लुकतुके

यामाहा कंपनी भारतीय दुचाकी बाजारपेठेत जोरदार मुसंडी घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीची नवी स्ट्रीटबाईक डिसेंबर २०२४ मध्ये लाँच होणार आहे आणि ही बाईक आहे ट्रेंडसेटर. का ते बघूया… (Yamaha XSR 155)

आशियात आणि खासकरून इंडोनेशियात मिळालेल्या यशानंतर यामाहा कंपनी आपली एक्सएसआर १५५ ही बाईक भारतातही लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी कंपनीने डिसेंबर २०२४ हा मूहूर्त निवडला आहे. स्ट्रीट-बाईक प्रकारातील ही बाईक असली तरी तिचं डिझाईन रेट्रो लूक देणारं आहे आणि त्यामाने किंमत मात्र काहीशी कमी आहे. त्यामुळे रेट्रो लूकचा ट्रेंड सेट करणारी ही बाईक असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. (Yamaha XSR 155)

या बाईकची इंधनाची टाकी जुन्या टिअर-ड्रॉप आकाराची आहे. म्हणजेच अश्रूचा थेंब असावा अशा आकाराची आहे. बाईकचं १५५ सीसीबीएस इंजिन १९.३ पीएस ऊर्जा निर्माण करू शकतं. या बाईकची इंधन क्षमता १० लीटर इतकी आहे. इंडोनेशियात यावर्षी यामाहाने आपली ही बाईक लाँच केली. तेव्हाच तिच्या निओ-रेट्रो डिझाईनने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. (Yamaha XSR 155)

(हेही वाचा – Youngest Indian Golfer : १३ वर्षीय कार्तिक सिंग एशिया पॅसिफिक हौशी विजेतेपद स्पर्धेत खेळणारा सगळ्यात लहान गोल्फपटू)

यामाहा कंपनीने आपल्याच एक्सएसआर ५०० आणि एसएक्सआर ७०० या जास्त ताकदीच्या बाईकवरून या बाईकचं डिझाईन बनवलं आहे. या बाईकचे हेडलाईट आणि टेललाईट हे एलईडी प्रकारचे आहेत. या गाडीचं लिक्विड-कूल इंजिनमध्ये एक सिलिंडर आहे. यात ६ स्पीड गिअर बॉक्स आहे. तसंच बाईकला डेल्टाबॉक्स फ्रेम, युएसडी फोर्क आणि मोनोशॉक यंत्रणा देण्यात आली आहे. या बाईकची किंमत १,४०,००० रुपयांपासून सुरू होते. (Yamaha XSR 155)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.