Isha Dadawala : गुजराती कवयित्री आणि पत्रकार ईशा दादावाला

129
Isha Dadawala : गुजराती कवयित्री आणि पत्रकार ईशा दादावाला
Isha Dadawala : गुजराती कवयित्री आणि पत्रकार ईशा दादावाला

३८ वर्षीय ईशा दादावाला (Isha Dadawala) यांनी अगदी तरुण वयातच कवयित्री होण्याचा बहुमान मिळवला आहे. २०१३ मध्ये त्यांना गुजरात साहित्य अकादमीने गुजराती साहित्यातील योगदानासाठी युवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले. गुजरात साहित्य अकादमीने त्यांच्या जनमारो या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार दिला.

त्याचबरोबर त्यांना गुजरात समाचार आणि समन्वय यांनी रावजी पटेल पुरस्कार दिला, २००० मध्ये कवी गणी दहीवाला पुरस्कार, कॉफी-मेट्सतर्फे मुंबईतर्फे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार, मुंबईतील कला गुर्जरी संस्था यांचा सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार तसेच राष्ट्रीय कला केंद्रतर्फे सुरतचा सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार असे अनक पुरस्कार त्यांनी तरुण वयात मिळवले आहेत.

(हेही वाचा-Shiraz Minwalla : भारतीय सैद्धांतिक भैतिकशास्त्रज्ञ शिराझ नवल मिनवाला)

वारतारो हा तिचा पहिला कवितासंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला आणि त्यानंतर जनमारो गाजलेला संग्रह प्रकाशित झाला. २०११ मध्ये त्यांनी क्या गयी छोकरी ही कादंबरी लिहिली. विशेष म्हणजे ही कादंबरी डायरी स्वरूपात लिहिलेली आहे. या सुंदर कवयित्रीचा जन्म २ जानेवारी १९८५ रोजी सुरत येथे झाला.

२००२ मध्ये त्यांनी सुरतच्या जीवन भारती हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००५ मध्ये वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. आता त्या व्हिडिओ ई पेपर अनन्या सिटीच्या मालक आणि संपादक आहेत. त्याचबरोबर त्या दिव्य भास्करमध्ये स्तंभ लिहितात. कविता आणि पत्रकारिता या क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर असतो.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.