Shiraz Minwalla : भारतीय सैद्धांतिक भैतिकशास्त्रज्ञ शिराझ नवल मिनवाला

147
Shiraz Minwalla : भारतीय सैद्धांतिक भैतिकशास्त्रज्ञ शिराझ नवल मिनवाला
Shiraz Minwalla : भारतीय सैद्धांतिक भैतिकशास्त्रज्ञ शिराझ नवल मिनवाला

शिराझ नवल मिनवाला (Shiraz Minwalla) हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हऑरेटिकल फिजिसिस्ट आणि स्ट्रिंग सिद्धांतकार म्हणजे स्ट्रिंग थिऑरिस्ट आहेत. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म २ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला.

मिनवाला यांनी १९८८ मध्ये कॅम्पियन स्कूल, मुंबई आणि त्यानंतर १९९५ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरमधून पदवी प्राप्त केली. नॅथन सीबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळविण्यासाठी Princeton University मध्ये गेले. ते हार्वर्ड ज्युनियर फेलो होते आणि त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होते.

(हेही वाचा-Japan Earthquake : एक डझनहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं; अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ व्हायरल)

शिराझ यांनी अगदी तरुण वयातच खूप यश प्राप्त केले. त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून २००६-०६ मध्ये स्वर्णजयंती फेलोशिप देण्यात आली. त्यांना २०१० मध्ये ICTP पुरस्कार मिळाला आणि २०११ मध्ये भौतिक विज्ञान श्रेणीतील विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार मानला जातो.

विशेष म्हणजे २०१६ मध्ये, वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांना भौतिकशास्त्रातील TWAS पुरस्कार त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर २०१३ मध्ये इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनतर्फे भौतिक विज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.