Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?

143

दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर लोकं शक्यतो भारतीय ट्रेनची निवड करतात. कारण गरिबांसह श्रीमंतांपर्यंत सर्वच जण कमी पैशात ट्रेनने दूरचा प्रवास करणं पसंत करतात. कारण भारतीय रेल्वे लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करत असते. तुम्ही कधी ट्रेनमध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे डबे असतात. जनरलपासून ते एसी डब्यापर्यंत लोक त्यांच्या सोयीनुसार आणि बजेटनुसार ते निवडून प्रवास करतात. मात्र तुम्ही हिवाळ्यात कधी एसी डब्ब्याचे रिझर्व्हेशन केले असेल तर तुमच्या मनात कधीतरी नक्कीच हा प्रश्न आला असेल की हिवाळ्यात ट्रेनच्या एसी कोचचे एअर कंडिशनर बंद ठेवलेले दिसते, असे असले तरी रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे एसीचे शुल्क आकारते…त्याचे कारण तुम्हाला माहितीये का…

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

तुम्हाला माहितीच असेल की ट्रेनमधील एसी कोचचे भाडे स्लीपर आणि जनरल कोचपेक्षा जास्त असते. याला कारण म्हणजे डब्यात बसवण्यात आलेला एसी आणि इतर सुविधा देखील या कोचमध्ये देण्यात येतात. ट्रेनचे एसी डबे हे वातानुकूलित असतात. मात्र हिवाळ्यात हे ट्रेनचे डबे वातानुकूलित नसतात. कारण हिवाळ्यात ट्रेनचा एसी कोच पुर्णपणे उबदार तर उन्हाळ्यात तो थंडगार ठेवण्यात येतो.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

रेल्वेतील एसी हा सर्व हंगामात काम करतो

उन्हाळ्यात बाहेरचे तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस असते तेव्हा डब्यातील तापमान 20-25 अंश सेल्सिअस ठेवले जाते. याउलट, हिवाळ्यात बाहेरचे तापमान 0 डिग्री पर्यंत असते, त्यामुळे ट्रेनच्या डब्याचे तापमान 17-21 डिग्री पर्यंत ठेवले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन्ही हंगामात प्रवास करण्याची मोठी सोय रेल्वेकडून करण्यात आलेली असते.

उन्हाळ्याच्या हंगामात ट्रेनमधील एसीबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पण हिवाळ्याच्या हंगामात याच ट्रेनमध्ये ही एसी संपूर्ण वातावरण ऊबदार करण्याचे काम करते. दरम्यान, हिवाळ्यात ट्रेनमध्ये असलेल्या एसीमध्ये बसवलेले हीटर चालवले जाते आणि ब्लोअरद्वारे गरम हवा संपूर्ण डब्यात पसरवली जाते. ट्रेनमध्ये बसवलेले हीटर हे विशेष प्रकारचे असते त्यामुळे तुम्हाला एसी कोचमध्ये देखील ऊबदार वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.